'बाहुबली' फेम प्रभासचं संपूर्ण नाव तुम्हाला माहिती आहे का?

प्रभासने 'द कपिल शर्मा शो' या कॉमेडी कार्यक्रमात हजेरी लावली. यात प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने प्रभासचे खरे नाव सांगितले आणि त्याच्या चाहत्यांना एकच धक्का बसला.

Prabhas full name, ‘बाहुबली’ फेम प्रभासचं संपूर्ण नाव तुम्हाला माहिती आहे का?

मुंबई : बाहुबली चित्रपटाद्वारे देश-विदेशात एका रात्रीत प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता प्रभास (Prabhas) सध्या चांगलाच लोकप्रिय झाला आहे. बाहुबलीच्या भरघोस यशानंतर प्रभास (Prabhas) ‘साहो’ (Saaho movie) या रोमांचक चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. येत्या 30 ऑगस्टला साहो चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच प्रभासने ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) या कॉमेडी कार्यक्रमात हजेरी लावली. यात प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने प्रभासचे खरे नाव सांगितले आणि त्याच्या चाहत्यांना एकच धक्का बसला.

‘साहो’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली. यात कपिलने प्रभासची तोंडओळख करताना त्याचे संपूर्ण नाव सांगितले. कपिलने प्रभासची ओळख करताना ‘वेंकटेश सत्यनारायणा प्रभास राजू उप्पलपत्ति’ याचे शो मध्ये स्वागत…ही 5 वेगवेगळी माणसे नाहीत, तर एकच व्यक्ती आहे. पण तो एकटाच 5 स्टार्सच्या बरोबरीचा आहे.

कपिलने प्रभासचे संपूर्ण नाव घेतल्यानंतर चाहत्यांना हा नेमका कोण? असा प्रश्न पडला. मात्र त्यानंतर त्या ठिकाणी प्रभासला बघितल्यानंतर त्याचे चाहते चकित झाले. प्रभासने कपिलच्या शो मध्ये इंट्री केल्यानंतर प्रेक्षकांनी जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

‘द कपिल शर्मा’ या शो मध्ये प्रभासने टी-शर्ट, कोट, पॅट आणि लोफर्सचे शूज घातले होते. शो सुरु झाल्यानंतर कपिलने प्रभास आणि श्रद्धाला काही गमतीशीर प्रश्न विचारले. यातील एक प्रश्न म्हणजे जर तुला एक दिवसासाठी देशाचे पंतप्रधान बनवले तर तु काय करशील? याला उत्तर देताना प्रभास म्हणाला, “मी इंडस्ट्रीतील मुलाखती सगळ्यात पहिल्यांदा बंद करेन”… हे ऐकल्यावर कपिलच नव्हे तर उपस्थित असलेले सगळेच जण खळखळून हसायला लागले.

प्रभास आणि श्रद्धा साहोचे प्रमोशन करण्यासोबतच कपिलच्या टीमसोबत खूप धमाल मस्ती केली. या कार्यक्रमात प्रभास आणि श्रद्धा त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील मनोरंजक किस्से प्रेक्षकांना सांगितले. तसेच द कपिल शर्मा शो मध्ये कपिलने प्रभास आणि श्रद्धाची थट्टा मस्करी केली.

प्रभास हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही हजारो तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. आता लवकरच प्रभास साहो चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे बजेट 350 कोटी आहे. येत्या 30 ऑगस्टला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.

साहो या चित्रपटात प्रभास, श्रद्धा कपूर, यांच्यासह अभिनेता नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे हे कलाकार दिसणार आहे. यूवी क्रियेशन प्रोडक्शन आणि टी-सिरिज मिळून हा चित्रपट तयार केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *