ATM चा पासवर्ड न दिल्याने जेसीबी ऑपरेटरची हत्या

परभणी : एटीएमचा पासवर्ड दिला नाही म्हणून जेसीबी ऑपरेटरचा धारदार शस्त्राने हल्ला करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी देशमुख येथे घडली. 22 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. हत्या करुन मारेकरी पसार झाले आहेत. यासंदर्भात ताडकळस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर, गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसांनी मोहिम आखली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक …

ATM चा पासवर्ड न दिल्याने जेसीबी ऑपरेटरची हत्या

परभणी : एटीएमचा पासवर्ड दिला नाही म्हणून जेसीबी ऑपरेटरचा धारदार शस्त्राने हल्ला करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी देशमुख येथे घडली. 22 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. हत्या करुन मारेकरी पसार झाले आहेत.

यासंदर्भात ताडकळस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर, गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसांनी मोहिम आखली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या नेतृत्त्वात तपासाचा वेग वाढवण्यात आला. परभणीतील शिवरामनगर येथून रामेश्वर देवनाळे आणि बुलडाण्यातील सोनाटी मेहकर येथून वैभव मानवतकर या दोन गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. याच प्रकरणातील मुख्य आरोपी अजिंक्य जगताप याचा सध्या शोध सुरु आहे.

हे आहेत मारेकरी!

रामेश्वर देवनाळे आणि वैभव मानवतकर हे दोघे औरंगाबाद येथील एका खासगी कंपनीत काम करत होते. मात्र, या दोघांच्या दारुच्या व्यसनामुळे कंपनीने त्यांना कामवरुन कमी केले. त्यानंतर या तरुणांनी ऐश्योआरामी जगण्यासाठी मेहनीचा मार्ग न निवडता, रस्त्यावर लूटमार करणे, शस्त्रांचा धाक दाखवून पैसे लुटणे इत्यादी गुन्हे करायला सुरुवात केली. याच गुन्हेगारांनी पैसे लुटण्यासाठी एटीएमचा पासवर्ड दिला नाही म्हणून जेसीबी ऑपरेटरची हत्या केल्याचे समोर आले आहे.

आरोपींनी काय माहिती दिली?

रामेश्वर देवनाळे, वैभव मानवतकर आणि अजिंक्य जगताप या तिघांनी मिळून जेसीबी ऑपरेटर संतोष सांगळे याच्याकडे एटीएम पासवर्ड मागितला. संतोष सांगळे याने पासवर्ड देण्यास नकार दिल्याने, तिन्ही गुन्हेगारांनी संतोषला लाकडाने मारहाण करत त्याची हत्या केली.

दरम्यान, पोलिस सध्या अजिंक्य जगताप या मुख्य गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *