बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात 'हे' कलाकार झळकणार

मुंबई : अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेल्या ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात कोणकोणते कलाकार दिसणार याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. बिग बॉसला उद्या (26 मे) पासून सुरुवात होणार आहे. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात 14 कलाकार कोण असणार? याची यादी नुकतीच ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. काही दिवसांपूर्वी …

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात 'हे' कलाकार झळकणार

मुंबई : अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेल्या ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात कोणकोणते कलाकार दिसणार याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. बिग बॉसला उद्या (26 मे) पासून सुरुवात होणार आहे. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात 14 कलाकार कोण असणार? याची यादी नुकतीच ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे.

काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन सीझन 2 मध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याबाबतच एक ट्विट करण्यात आलं  होतं. या ट्विटनंतर नव्याने आणखी एक ट्विट बिग बॉसने प्रेक्षकांना कोडं घातलं होतं. या कोड्यानुसार प्रेक्षकांना सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावाची पहिली अक्षरे देण्यात आली होती. या अक्षरावरुन स्पर्धकांची नावे ओळखा असे बिग बॉसने सांगितलं होतं. वै, आ, सु, चि, अ, प्रा अशी ही अक्षर होती. या अक्षरानंतर बिग बॉस मराठीच्या चाहत्यांनी विविध नाव ओळखायला सुरुवात केली होती.

टीव्हीवरील प्रेक्षकांच्या सर्वात आवडता रिअलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’.. हिंदी बिग बॉस हिट झाल्यानंतर गेल्यावर्षी मराठीतून बिग बॉसला सुरुवात झाली. बिग बॉस सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांनी त्याला चांगलंच डोक्यावर घेतलं. बिग बॉसचा पहिला सिझन हिट ठरल्यानंतर उद्यापासून बिग बॉस मराठीचा दुसऱ्या सिझनला सुरुवात होणार आहे. गेल्या सिझनप्रमाणे या सिझनचे सुत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर करणार आहे. गेल्यावर्षीही बिग बॉसमध्ये कोणते स्पर्धक दिसणार हे गुपित ठेवण्यात आलं होतं. यावर्षीही यात सहभागी होणाऱ्या कलाकारांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहे. मात्र यंदाच्या बिग बॉस मराठीमध्ये कोण झळकणार? याबाबत माहिती ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे.

बिग बॉस 2 सहभागी होणाऱ्या कलाकारांची यादी

१) शिव ठाकरे

२) माधव देवच्चके

३) वैशाली माढे

४) शिवानी सुर्वे

५) किशोरी शहाणे

६) वीणा जगताप

७) रुपाली भोसले

८) मैथिली जावकर

९) मिलिंद शिंदे

१०) सुरेखा पुणेकर

११) अभिजित केळकर

१२) प्राची पिसाट

१३) अभिजित बिचकुले

१४) पराग कान्हेरे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *