विमानतळावर निगेटिव्ह रिपोर्ट, रत्नागिरीच्या रुग्णाला ‘असे’ झाले कोरोनाचे निदान

विमानतळावर तपासणी झाली त्यावेळी संबंधित रुग्ण 'कोरोना'ग्रस्त नसल्याचा अहवाल देण्यात आला होता, मात्र ताप येऊ लागल्याने ते एका खासगी दवाखान्यात गेले आणि निदान होण्याच्या दिशेने एक पाऊल पडलं Ratnagiri Corona Patient Diagnosis

विमानतळावर निगेटिव्ह रिपोर्ट, रत्नागिरीच्या रुग्णाला 'असे' झाले कोरोनाचे निदान
Follow us
| Updated on: Mar 19, 2020 | 8:11 AM

रत्नागिरी : दुबईहून रत्नागिरीला परत आलेल्या एका प्रौढ व्यक्तीला ‘कोरोना’ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णाचा अहवाल बुधवारी रात्री सव्वानऊ वाजता रत्नागिरीत थडकला आणि आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली. विमानतळावर तपासणी झाली त्यावेळी तो ‘कोरोना’ग्रस्त नसल्याचा अहवाल देण्यात आला होता, ही बाबच चिंताजनक ठरत आहे. (Ratnagiri Corona Patient Diagnosis)

संबंधित रुग्ण मंगळवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. तो ‘कोरोना’ग्रस्त असल्याची अधिकृत माहिती रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली. त्यांच्यासोबत आणखी दोघेजण दुबईहून आले होते. आता त्यांच्यावरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. हा राज्यभरातील 45 वा रुग्ण आहे.

संबंधित रुग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी भागातील आहे. ते दुबईमध्ये नोकरी करतात. ‘कोरोना’च्या थैमानामुळे ते दुबईहून परत आले. विमानतळावर त्यांची तपासणी झाली, मात्र ते कोरोनाग्रस्त नसल्याचा अहवाल देण्यात आला. तिथून ते शृंगारतळीला आले.

Corona Effect | पुण्यात अमृततुल्य चहाची दुकान दोन दिवस बंद, दारु विक्रीवरही 31 मार्चपर्यंत बंदी

मंगळवारी ताप येऊ लागल्याने ते एका खासगी दवाखान्यात गेले. ते दुबईहून आले असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरनी त्यांना दुसऱ्या डॉक्टरांकडे पाठवले. त्यांनाही ही माहिती लक्षात आल्यानंतर त्यांनी या रुग्णाला गुहागर ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवले. तिथून 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. (Ratnagiri Corona Patient Diagnosis)

जिल्हा रुग्णालयाकडून लगेचच त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले. बुधवारी रात्री या तपासणीचा अहवाल जाहीर करण्यात आला. संबंधित रुग्णाला कोरोना झाला असल्याचा अंतिम निष्कर्ष काढण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी यांची बैठक

पुणे येथून अहवाल येताच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर तसेच काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर डॉ. बोल्डे यांनी संबंधित रुग्णाला कोरोना झाला असल्याची अधिकृत माहिती दिली.

संबंधित रुग्णासोबत आणखी दोघेजण दुबईहून आले आहेत. मात्र ते कोठेही तपासणीसाठी पुढे आलेले नाहीत. आता या रुग्णाला कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यासोबत आलेल्या दोघांकडे आरोग्य यंत्रणेने आपला मोर्चा वळवला आहे. (Ratnagiri Corona Patient Diagnosis)

ही बातमी वाचलीत का? :

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.