सकाळी नऊ ते अकरा ठरली 'घातवेळ', पुण्यात दोन तासात तीन कोरोनाग्रस्त दगावले

पुण्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधित मृतांचा आकडा आता आठ झाला आहे. (Three COVID-19 patients die in Pune)

सकाळी नऊ ते अकरा ठरली 'घातवेळ', पुण्यात दोन तासात तीन कोरोनाग्रस्त दगावले

पुणे : पुण्यात आज सकाळच्या वेळेतच तिघा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. सकाळी नऊ ते अकरा या दोन तासांच्या वेळेत हे तिन्ही रुग्ण दगावले. पुण्यात ‘कोरोना’मुळे बळी पडलेल्या नागरिकांची संख्या आठवर पोहोचली आहे. (Three COVID-19 patients die in Pune)

तिन्ही कोरोनाग्रस्त रुग्णांचे वय 60 वर्षांपुढील होते. त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत होता. पुण्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा आता आठ झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असं आवाहन पुन्हा केलं जात आहे.

आज दिवसभरात (7 एप्रिल) राज्यात 23 कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 900 जवळ येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रात 891 कोरोनाग्रस्त असून मृतांचा आकडा 55 वर गेला आहे. मुंबईत 526 तर पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 145 वर पोहोचली आहे.

हेही वाचा : Corona | नाना पेठ, कोंढवा, सिंहगड रोडवर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, पुणेकरांची चिंता वाढली

पुण्यात 5 एप्रिललाही 24 तासात तीन कोरोनाग्रस्त मृत्युमुखी पडले होते. ‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्या पुण्यातील त्या तिघांनीही परदेश प्रवास केलेला नव्हता. त्यामुळे स्थानिक संसर्गाची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजच्या दिवसात झालेल्या तीन मृत्यूंचा तपशील अद्याप मिळालेला नाही.

पुण्यातील ‘त्या’ महिलेचा कोरोना रिपोर्ट मृत्यूनंतर पॉझिटिव्ह

पुण्यात 5 एप्रिलला मृत्यू झालेली 60 वर्षीय महिला आधी नायडू रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी ती ‘कोरोना’ निगेटिव्ह असल्याने तिला डिस्चार्ज दिला होता. मात्र घरी गेल्यानंतर इंक्युबेशन पिरेडमध्ये असताना अचानक तिची तब्येत ढासळली. ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं जात असताना तिचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर सॅम्पल चेक केले असता, ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती.

Three COVID-19 patients die in Pune

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
12. पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल
19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल
26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल
28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल
32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू -= 4 एप्रिल
33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
34. पुणे – 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल
35. पुणे – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
36. औरंगाबाद – 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल
37. डोंबिवली – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
38. मुंबई- 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
39. मुंबई- 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
40. मुंबई- 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
41. मुंबई- 70 वर्षीय महिलेचा मृत्यू- 5 एप्रिल
42. मुंबई- 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
43. मुंबई- 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
44. मुंबई- 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
45. मुंबई- 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
46. अंबरनाथ – एका रुग्णाचा मृत्यू – 6 एप्रिल
47. मुंबई – 41 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल
48. मुंबई – 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल
49. मुंबई – 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल
50. मुंबई – 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल
51. मुंबई – 30 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू – 6 एप्रिल
52. मुंबई – 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल
53. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल
54. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल
55. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल

महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्तांची ताजी आकडेवारी इथे पाहा :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई434923741417
पुणे (शहर+ग्रामीण)7961938356
पिंपरी चिंचवड मनपा5023411
ठाणे (शहर+ग्रामीण)
50523693
नवी मुंबई मनपा30018074
कल्याण डोंबिवली मनपा14449127
उल्हासनगर मनपा4069
भिवंडी निजामपूर मनपा199117
मिरा भाईंदर मनपा76315730
पालघर 17113
वसई विरार मनपा102810531
रायगड673526
पनवेल मनपा56525
नाशिक (शहर +ग्रामीण)473210
मालेगाव मनपा76258
अहमदनगर (शहर+ग्रामीण)165368
धुळे17720
जळगाव 781174
नंदूरबार 374
सोलापूर10324185
सातारा564322
कोल्हापूर 60726
सांगली126294
सिंधुदुर्ग7820
रत्नागिरी31425
औरंगाबाद16531484
जालना1542
हिंगोली 19310
परभणी731
लातूर 12583
उस्मानाबाद 9132
बीड491
नांदेड 1356
अकोला 6471433
अमरावती 26116
यवतमाळ 148221
बुलडाणा 7483
वाशिम 80
नागपूर6358411
वर्धा 901
भंडारा3700
गोंदिया 6610
चंद्रपूर2710
गडचिरोली3900
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)63018
एकूण74860323292587

(Three COVID-19 patients die in Pune)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *