तुला मला का भेटायचं होतं? राज ठाकरेंच्या प्रश्नावर चिमुकलीचं गोंडस उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एका चिमुकलीसोबतचा व्हिडीओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे (Little girl meet Raj Thackeray).

तुला मला का भेटायचं होतं? राज ठाकरेंच्या प्रश्नावर चिमुकलीचं गोंडस उत्तर
Follow us
| Updated on: Mar 16, 2020 | 5:03 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एका चिमुकलीसोबतचा व्हिडीओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे (Little girl meet Raj Thackeray). या व्हिडीओमध्ये एक चिमुकली राज ठाकरे यांची भेट घेताना दिसत आहे. चिमुकलीसोबत तिचे आई-वडीलदेखील आहेत. हा व्हिडीओ मनसेने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर देखील शेअर केला आहे (Little girl meet Raj Thackeray).

“एका चिमुरडीला राज ठाकरे यांना भेटण्याची आर्त इच्छा होती. तसा तिने आपल्या बाबांकडे हट्टच धरला होता आणि जेव्हा त्या निरागस चिमुकलीने राजसाहेबांची भेट घेतली तेव्हा राजसाहेबांनी विचारलं, तुला मला का भेटायचं होतं? त्यावर या चिमुकलीने निशब्द असं गोंडस उत्तर दिलं:, असं मनसेनं आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे.

राज ठाकरे यांची भेट घेणारी चिमुकली मनसेचे कार्यकर्ते प्रफुल्ल पाटील यांची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. या चिमुकलीचं नाव रुद्राणी असं आहे. ती तीन वर्षांची आहे. तिला राज ठाकरे यांना भेटण्याची प्रचंड इच्छा होती. त्यामुळे ती आपल्या वडिलांकडे वारंवार तसा हट्ट करायची.

चिमुकली आणि तिचे आई-वडील आज अखेर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. यावेळी चिमुकलीने राज ठाकरे यांना नमस्कार केला. राज ठाकरे यांनी चिमुकलीला तुला मला का भेटायचं होतं? असा प्रश्न विचारला. यानंतर मुलीने राज ठाकरे यांच्या गालावर पप्पी दिली. त्यानंतर राज यांनी मायेने चिमुकलीच्या डोक्यावर हात फिरवला. हा भावनिक क्षण व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. त्यानंतर चिमुकलीच्या वडिलांनी राज ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकच आमदार असला तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे. लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत मोदी सरकारवर प्रचंड टीका केली होती. राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते. राज्यात त्यांचे प्रचंड चाहते आहेत.

हेही वाचा : Corona | तुळजाभवानी देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद, चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.