युवराज सिंह – भारताचा नवा मायकल जॅक्सन!

मायकल जॅक्सनच्या ब्रेकडान्सपासून प्रेरित होऊन भारतातही एक असाच मायकल टिकटॉकवर धुमाकूळ घालत आहे. टिकटॉकवर त्याचं 'बाबा जॅक्सन' असं नाव आहे.

युवराज सिंह - भारताचा नवा मायकल जॅक्सन!
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 2:10 AM

चेतन पाटील, टीव्ही 9 मराठी, जोधपूर : मायकल जॅक्सनला संपूर्ण जग ओळखतं. त्याचा ब्रेकडान्स आजरामर ठरला. आजही कोट्यवधी चाहते मायकलच्या ब्रेक डान्सचे व्हिडिओ बघतात. जगातील या ब्रेक डान्सरपासून प्रेरित होऊन भारतातही एक असाच मायकल टिकटॉकवर धुमाकूळ घालत आहे (Tik-Tok star Yuvraj Singh). त्याच्या फक्त एकाच व्हिडिओवर लाखो लोक कौतुकाचा वर्षाव करतात. या डान्सरचं नाव युवराज सिंह असून टिकटॉकवर त्याचं ‘बाबा जॅक्सन’ असं नाव आहे (Tik-Tok star Yuvraj Singh). त्याचा ब्रेक डान्सबघून अल्पावधीतच 8 लाख 37 हजार 400 लोकांनी त्याला फॉलो केले. युवराजने ‘TV 9 मराठी’शी खास बातचीत केली. यामध्ये त्याने आपला आतापर्यंतचा प्रवास उलगडला.

राजस्थानच्या जोधपूरमध्ये युवराज सिंह नावाचा हा 18 वर्षीय अवलिया राहतो. या अवलियाला डान्सची प्रचंड गोडी. त्याचे वडील घराच्या टाईल्स लावायचे काम करतात. तर आई गृहिणी आहे. त्याला दोन लहान बहिणी आहेत. युवराज नुकताच 12 वी पास झालाय आणि सध्या तो स्टेनोग्राफीचा कोर्स करतोय. इतर सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे त्याचं कुटुंब आहे. मात्र, टिकटॉकवर युवराजची प्रचंड हवा आहे. त्याचा ब्रेकडान्स पाहून लाखो लोक त्याचं कौतुक करतात. तितका भन्नाट डान्स तो करतोच.

@babajackson2020#tiptipbarsapani♬ original sound – bnymn541969

युवराजला टिकटॉकवर आता लाखो फॉलोअर्स असतीलही मात्र आतापर्यंतचा त्याचा प्रवास अवघड होता. युवराजच्या घरात त्याच्यासह पाच सदस्य आहेत आणि घरात इंटनेट चालेल असा एकच मोबाईल होता. त्यामुळे प्रत्येकाला फक्त 15 ते 20 मिनिट इतका वेळ मोबईल मिळायचा. या वेळेत तो यूट्यूबवर बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या डान्सचे व्हिडिओ बघायचा. ‘मुन्ना मायकल’ हा चित्रपट बघितल्यानंतर त्याच्या मनात डान्सची गोडी निर्माण झाली. ‘हिरोपंती’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तो टायरगरचा प्रचंड मोठा फॅन झाला.

@babajackson2020♬ original sound – brbhai

विशेष म्हणजे युवराज सध्या जितका काही ब्रेकडान्स करतो ते तो गेल्या पाच ते सहा महिन्यातच शिकला असल्याचं त्यानं सांगितलं. सुरुवातीला तो टायगर श्रॉफचे व्हिडिओ बघायचा. त्यानंतर मायकल जॅक्सनचे व्हिडिओ बघायला लागला. सुरुवातीला घरच्यांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यावेळी तो एखाद्या रुममध्ये गपचूप व्हिडिओ बघायचा आणि तसा डान्स करण्याचा प्रयत्न करायचा. कालांतराने तो त्याचे व्हिडिओ देखील बनवायला लागला.

@babajackson2020#mammukka♬ original sound – bijju3210

कॉलेजमध्ये एखादा वर्ग रिकामा असला की युवराज तिथे देखील डान्सचा सराव करायचा. सुरुवातीला त्याच्याजवळ ब्रेकडान्ससाठी लागणारे बूट नव्हते, याशिवाय हवे तसे कपडे देखील नव्हते. तो बूटशिवाय डान्स करायचा. कालांतरानं तो पायात सॉक्स घालून व्हिडिओ बनवायला लागला. यामध्ये त्याचे कित्येक सॉक्स फाटले, असं त्याने सांगितलं. मात्र, अखेर जेव्हा व्हिडिओला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळायला लागले तेव्हा घरच्यांनी त्याला बूट आणि हवे तसे कपडे घेऊन दिले.

@babajackson2020#mammukka♬ MUQABLA – YASH NARVEKAR,PARAMPARA THAKUR

युवराजचे टिकटॉकवर ‘बाबा जॅक्सन’ असे नाव आहे. या नावाबाबत त्याला प्रश्न विचारला असता त्यावर त्याने भन्नाट उत्तर दिलं. ‘नाव काय ठेवावं याचा मी विचार करत होतो. मला मायकल जॅक्सन आवडतो आणि त्यावेळी अभिनेता संजय दत्तचा ‘संजू’ चित्रपटही आला होता. तो चित्रपट बघितल्यानंतर मी प्रभावित झालो आणि मी टिकटॉकवर ‘बाबा जॅक्सन’ असं नाव ठेवलं’, असं युवराजने सांगितलं.

@babajackson2020#bhultohhogyijokiasokia♬ original sound – Rohit Kumar Singh323

युवराजला बऱ्याच लोकांनी DID या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला. आम्ही त्याला त्याचं नेमकं काय स्वप्न आहे, याबाबत विचारलं. तेव्हा त्यानं सांगितलं की, ‘World of Dance मध्ये मला सहभागी व्हायचं आहे. याशिवाय मला चित्रपटात संधी मिळाली तर तेही काम करायला आवडेल.’

‘काम असं करेल की टायगर श्रॉफ मला भेटायला येईल’

युवराजला टायगर श्रॉफ प्रचंड आवडतो. टायगरच्या बाबतीत तो अत्यंत संवेदनशील आणि हळवा आहे. त्याने त्यासंदर्भात एक किस्सा सांगितला. एके दिवशी युवराज ट्युशनला जाणार होता. मात्र, टीव्हीवर कुठला तरी एक पुरस्कार सोहळा सुरु होता. त्या सोहळ्यात टायगरचा डान्स सर्वात शेवट प्रक्षेपित होणार होता. तो टायगरच्या डान्सची वाट पाहत होता. मात्र, ट्युशनला जायचं असल्यामुळे त्याच्या आईने टीव्ही बंद केली आणि त्याला ट्युशनला जायचं सांगितलं. त्यामुळे युवराजला रडू आलं. मात्र, त्यावेळीचं त्यानं ठरवलं की काम असं करायचं की टायगर श्रॉप आपल्याला भेटायला येईल. आज त्यानुसार त्याने मेहनत केली आणि लाखो लोक त्याला फॉलो करत आहेत. अजून तरी त्याचं काम टायगरपर्यंत पोहोचलेलं नाही. मात्र, ते काम नक्की पोहोचेल, अशी त्याची खात्री आहे.

@babajackson2020Dance with my sister♬ original sound – POP Mahesh Sharma

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.