सुट्ट्यांमध्ये व्याघ्र दर्शनाचा प्लान करताय, तर टिपेश्वर अभयारण्याला नक्की भेट द्या!

यवतमाळ : उन्हाळ्याच्या दिवसात टिपेश्वर अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटक या अभयारण्याकडे आकर्षित होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ यासह अभयारण्याच्या सीमेलगत असलेल्या आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी जंगल सफर करण्यासाठी येत आहेत. क्षेत्रफळाने लहान असलेल्या या अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. हमखास होणारे व्याघ्रदर्शन म्हणून टिपेश्वर अभयारण्याने अल्पावधीतच ख्याती …

सुट्ट्यांमध्ये व्याघ्र दर्शनाचा प्लान करताय, तर टिपेश्वर अभयारण्याला नक्की भेट द्या!

यवतमाळ : उन्हाळ्याच्या दिवसात टिपेश्वर अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटक या अभयारण्याकडे आकर्षित होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ यासह अभयारण्याच्या सीमेलगत असलेल्या आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी जंगल सफर करण्यासाठी येत आहेत. क्षेत्रफळाने लहान असलेल्या या अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

हमखास होणारे व्याघ्रदर्शन म्हणून टिपेश्वर अभयारण्याने अल्पावधीतच ख्याती प्राप्त केली. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक याठिकाणी हजेरी लावत आहेत.

पांढरकवडा वन्यजीव विभाग अंतर्गत येत असलेल्या घाटंजी आणि केळापूर या दोन तालुक्यात 148 चौरस किलोमीटरवर हे वन्यजीव अभयारण्य विस्तारलेलं आहे. पर्यटकांना या अभयारण्यात जाण्यासाठी सुन्ना आणि माथनी हे दोन गेट आहेत. सुन्ना या गेटवरून 11 वाहने तर माथनी या गेटवरून 12 वाहने सकाळी 5.30 ते 7 आणि दुपारी 3 ते 4.30 या कालावधीत सोडली जातात. 2018 मध्ये 1504 वाहनांतून 7 हजार पर्यटकांनी भेट दिली. तर या वर्षाच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण ऑनलाईन बुकिंग फुल असल्याचं वन्यजीव अभयारण्याकडून सांगण्यात आलं.

पांढरकवडा वन्यजीव विभागाच्या या अभयारण्याची निर्मिती 1997 साली करण्यात झाली. मात्र, मारेगाव तालुक्यातील काही गाव आणि टिपेश्वर या गावांचे पुनर्वसन करण्यात आल्याने या अभयारण्यात वाघांसह  इतर प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. या अभयारण्यात वाघ, नीलगाय, रानकुत्रे, कोल्हा, अस्वल, चितळ, सांबर, चांदी अस्वल, मोर यासह इतर प्राण्यांचा वावर आहे. अभयारण्याच्या भागामध्ये नैसर्गिक पानवठे तसेच सोलर पंप लावून कुत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *