पुण्यात 54 जणांना कोरोनांचा संसर्ग, मरकजमध्ये सहभागी झालेल्यांची शोधाशोध सुरुच

कोरोनाच्या वाढत्या आकड्यांनी जगभरात काळजी वातावरण आहे. पुण्यातही आता कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 54 वर पोहचली आहे (Total Corona patient in Pune).

पुण्यात 54 जणांना कोरोनांचा संसर्ग, मरकजमध्ये सहभागी झालेल्यांची शोधाशोध सुरुच

पुणे : कोरोनाच्या वाढत्या आकड्यांनी जगभरात काळजी वातावरण आहे. पुण्यातही आता कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 54 वर पोहचली आहे (Total Corona patient in Pune). विशेष म्हणजे मरकजवाल्यांची पहिली यादी पुणे महानगरपालिकेला मिळाली आहे. यातील 55 नागरिकांचा शोध लागला असून त्यातील एक जण कोरोनाबाधित आहे, तर दोघांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे, अशी माहिती पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. काही लोकांनी लपवालपवी केल्यानं कोरोना संसर्गाची संख्या वाढली.  आता यापुढे या रुग्णांची संख्या वाढणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मनापा आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, “पुण्यात सध्या कोरोना व्हायरसचे 45 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 54 रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातील काही उपचारानंतर बरे झाले आहेत. मनपाला आता मरकजला हजेरी लावलेल्यांची यादी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यातील 55 नागरिकांशी संपर्क साधण्यात आला आहे. यातील काही रुग्ण पॉझिटिव्ह असून 2 लोकांना होमक्वारंटाईन करण्यात आलं आहे. सुरुवातीला काही लोकांना लपवालपवी केली. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येऊन कोरोना संसर्गाची संख्या वाढली. येथून पुढे कोरोना रुग्णांची संख्या वाढणार नाही.”

कोरोना व्हायरस रुग्णांवर नायडू रुग्णालयात उपचार केले जातात. त्यामुळं नायडू रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर मिस्ट चेंबर उभारला आहे. जवळपास 3 लाख रुपये किमतीचा हा मिस्ट चेंबर आहे. या माध्यमातून कोणत्याही माणसाच्या पूर्ण शरिराचं सॅनिटायझेशन केलं जातं. हे ऑटोमॅटिक असून एक माणूस गोलाकार फिरल्यास 20 सेकंदांमध्ये सॅनिटायझेशन होतं. या चेंबरमध्ये सोडिअम हायपो क्लोराईड कमी प्रमाणात वापरलं जात आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं, असंही गायकवाड यांनी सांगितलं.

पीएमपीच्या 3 बसमध्ये फिरतं ‘सॅनिटायझर चेंबर’, 20 सेकंदात पूर्ण सॅनिटायझेशन करणार

अशाच पद्धतीने शहरात आता फिरते सॅनिटायझर सुरु करण्यात येणार आहे. पीएमपीच्या 3 बसमध्ये हे मोबाईल सॅनिटायझर कार्यन्वित करण्याचं काम सुरु आहे. येत्या काही दिवसांमध्ये पुणेकरांसाठी ते उपलब्ध होणार आहे. मार्केट यार्ड, स्मशानभूमी यासारख्या गर्दीच्या ठिकाणी हे सॅनिटायझर चेंबर उपलब्ध असेल. अशा बसमध्ये 20 सेकंदात पूर्ण सॅनिटायझेशन होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

  1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
  2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
    *मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
  3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
  4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
  5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
  6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
  7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
  8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
  9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
  10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
  11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
  12. पालघर  – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
  13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
  14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
  15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
  16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
  17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
  18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल
  19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
  20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
  21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
  22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
  23. पुणे : 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
  24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
  25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल
  26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
  27. मुंबई – 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
  28. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल
जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई422163741368
पुणे (शहर+ग्रामीण)7706938338
पिंपरी चिंचवड मनपा4903410
ठाणे (शहर+ग्रामीण)
48273691
नवी मुंबई मनपा28788071
कल्याण डोंबिवली मनपा14049127
उल्हासनगर मनपा3786
भिवंडी निजामपूर मनपा176116
मिरा भाईंदर मनपा73215729
पालघर 15613
वसई विरार मनपा96610530
रायगड648526
पनवेल मनपा56125
नाशिक (शहर +ग्रामीण)450210
मालेगाव मनपा76258
अहमदनगर (शहर+ग्रामीण)141367
धुळे17316
जळगाव 760172
नंदूरबार 373
सोलापूर9344175
सातारा562322
कोल्हापूर 54324
सांगली124294
सिंधुदुर्ग5220
रत्नागिरी30425
औरंगाबाद15921468
जालना1301
हिंगोली 19110
परभणी711
लातूर 12583
उस्मानाबाद 8031
बीड471
नांदेड 1296
अकोला 6421431
अमरावती 24516
यवतमाळ 131221
बुलडाणा 7383
वाशिम 80
नागपूर6148411
वर्धा 901
भंडारा3200
गोंदिया 6610
चंद्रपूर2610
गडचिरोली3800
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)62015
एकूण72300313332465

Total Corona patient in Pune

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *