नागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत कठोर नियमावली जारी केली आहे (Tukaram Mundhe on corona patient Funeral).

नागपुरात कोरोनाचा पहिला बळी, मृतदेह आणि अंत्यविधीसाठी तुकाराम मुंढेंची नियमावली

नागपूर : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 1000 पेक्षा जास्त झाली आहे. दुसरीकडे मृतांचा आकडा देखील वाढत चालला आहे. आज (7 एप्रिल) नागपूरमध्ये देखील पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत कठोर नियमावली जारी केली आहे (Tukaram Mundhe on corona patient Funeral). तसेच कोरोनाग्रस्त मृतदेहांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी या मार्गदर्शक तत्त्वांचं कठोर पालन करण्याचे निर्देश मुंढे यांनी दिले आहेत.

नागपूर शहरात कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. त्यामुळे या माध्यमातून संसर्गाचा धोका वाढला आहे. हा धोका लक्षात घेत नागपूर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाची पावलं उचलली आहेत. कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन व्हावं यासाठी पोलिस आयुक्तालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) प्रशासनाला देखील पत्र देण्यात आलं आहे.

कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्काराची नियमावली काय?

1. मृतदेहाला कुणीही स्पर्श करु नये.
2. मृतदेहावर अंत्यविधी करताना 5 पेक्षा अधिक लोकांनी उपस्थित राहू नये.
3. संबंधित रुग्णालय प्रशासनाने मृत्यूची माहिती आधी संबंधित पोलिस स्टेशनला द्यावी.
4. मृतदेहाला कुणी स्पर्श करणार नाही आणि अंत्यविधीला पाचपेक्षा जास्त लोक उपस्थित राहणार नाहीत, याची खातरजमा झाल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करणे.
5. अंत्यविधी करण्यात येणारे घाट किंवा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी मास्क, ग्लोव्ह आणि अन्य सुरक्षा साहित्यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे.

राज्यात नव्याने वाढलेले रुग्ण कुठे किती?

  • मुंबई – 116
  • पुणे – 18
  • ठाणे – 2
  • अहमदनगर – 3
  • बुलडाणा – 2
  • नागपूर – 3
  • औरंगाबाद – 3
  • सांगली – 1
  • सातारा – 1
  • रत्नागिरी – 1

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1018 वर पोहोचली आहे. यात मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद आहे. तर दुसऱ्या क्रमाकांवर पुण्याचा क्रमांक लागतो आहे.  यापाठोपाठ अहमदनगर आणि सांगलीचा क्रमांक आहे (Maharashtra Corona positive Patient).

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई410993741319
पुणे (शहर+ग्रामीण)7451938320
पिंपरी चिंचवड मनपा468349
ठाणे (शहर+ग्रामीण)
46543690
नवी मुंबई मनपा27298067
कल्याण डोंबिवली मनपा13339127
उल्हासनगर मनपा3566
भिवंडी निजामपूर मनपा154116
मिरा भाईंदर मनपा71515719
पालघर 15213
वसई विरार मनपा91910530
रायगड632520
पनवेल मनपा51321
नाशिक (शहर +ग्रामीण)42129
मालेगाव मनपा76158
अहमदनगर (शहर+ग्रामीण)120366
धुळे14516
जळगाव 696172
नंदूरबार 353
सोलापूर9334170
सातारा527316
कोल्हापूर 50924
सांगली112291
सिंधुदुर्ग3320
रत्नागिरी26425
औरंगाबाद15431468
जालना1291
हिंगोली 19010
परभणी631
लातूर 12583
उस्मानाबाद 7631
बीड471
नांदेड 1236
अकोला 6031428
अमरावती 23216
यवतमाळ 130221
बुलडाणा 6383
वाशिम 80
नागपूर5928411
वर्धा 901
भंडारा3200
गोंदिया 6610
चंद्रपूर2610
गडचिरोली3600
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)60015
एकूण70013301082362

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाचा गुणाकार, रुग्णांची संख्या हजार पार!

Pune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू

बारामतीत कोरोनाचा विळखा वाढला, कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण

Tukaram Mundhe on corona patient Funeral

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *