LIVE: अकरावी प्रवेशासाठी वाढीव जागा ठेवणार : आशिष शेलार

दिवसभरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचा एका क्लिकवर वेगवान आढावा...

LIVE:  अकरावी प्रवेशासाठी वाढीव जागा ठेवणार : आशिष शेलार
Picture

अकरावीच्या जागा वाढवणार - आशिष शेलार

अकरावी प्रवेशासाठी वाढीव जागा ठेवण्याचा शासनाचा निर्णय, शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा. अकरावीसाठी राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई या महाविद्यालयातील जागा वाढणार. दहावीतील राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण बंद केल्याने झाला होता गोंधळ. तो गोंधळ निस्तरण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी शासनाचा निर्णय. राज्य मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणं झालं होतं अवघड. राज्य मंडळाने दहावीचे अंतर्गत गुण बंद केल्याने विद्यार्थ्यांचा निकाल यंदा कमी लागला होता.

18/06/2019,12:48PM
Picture

आदित्य ठाकरे विधानसभेत हजर राहणार

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे विधानसभेत हजर राहणार, विधान भवनात अर्थसंकल्प सादर करताना उपस्थित राहणार

18/06/2019,1:18PM
Picture

विधानपरिषदेत जोरदार गोंधळ

18/06/2019,1:16PM
Picture

राजू शेट्टी यांची टीका

#MahaBudget2019 : अर्थसंकल्पातून काही अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल, आकर्षक घोषणा करण्यात भाजप सरकारचा हात कोणी धरणार नाही. हमीभावाच दिलेलं आश्वासन सरकारनं पाळलं नाही.आता सुद्धा अर्थसंकल्पातून काही मिळेल असं वाटतं नाही. सरकारच्या घोषणांवर माझा विश्वास नाही – राजू शेट्टी यांची टीका

18/06/2019,12:52PM
Picture

सोलापूरमध्ये दुधाच्या पीकअपने दोन चिमुरड्या भावांना चिरडले

सोलापूरमध्ये दुधाच्या पीकअपने दोन चिमुरड्या भावांना चिरडले, दोन्ही मुलांचा मृत्यू, आर्वी तात्यासाहेब काळे, जय तात्यासाहेब काळे असे मृत भावंडांची नावे, अंगणात खेळत असताना घडला प्रकार, माढा तालुक्यातील मुंगशी येथील घटना

18/06/2019,11:15AM
Picture

विरोधकांची दुसऱ्या दिवशीही घोषणाबाजी

विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांची घोषणाबाजी पाहायला मिळत आहे. विरोधकांनी पायऱ्यांवर निदर्शने केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांनी सरकार आर्थिक पाहणी अहवालात आकडेवारी फुगवून सांगत असल्याचा आरोप केला. बोगस आकडेवारी देणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशी घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी विरोधकांनी केली.

18/06/2019,11:09AM
Picture

विधानसभा पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

18/06/2019,11:06AM
Picture

बीबी का मकबऱ्यावरील कामगाराच्या मृत्यूच्या निषेधार्थ निदर्शने

बीबी का मकबऱ्यावरील कामगाराच्या मृत्यूच्या निषेधार्थ निदर्शने, सोमवारी मकबऱ्यावर काम करताना कामगाराचा मृत्यू

18/06/2019,10:42AM
Picture

विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद हवे, तर विधान परिषदेचे उपसभापती पद द्या

विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद हवे, तर विधान परिषदेचे उपसभापती पद द्या, भाजप-शिवसेनेकडून काँग्रेसची कोंडी, उपसभापती पदाचा प्रस्ताव दोन अधिवेशनापासून रखडलेलाच

18/06/2019,9:14AM
Picture

विखेपाटलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

विखेपाटलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, बेकायदेशी मंत्रीपद दिल्याचा आरोप, अॅड सतीश तळेकर यांचा आरोप

18/06/2019,9:12AM
Picture

पुण्यात विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून बिघाडीची शक्यता

पुण्यात विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून बिघाडीची शक्यता, काँग्रेसची 8 पैकी 4 जागा लढवण्याची तयारी, पुण्यात काँग्रेसचा फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्मुला

18/06/2019,9:09AM
Picture

जालन्यात विहिरीसाठी ब्लास्टिंग घेणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये जिलेटीनचा स्फोट

जालन्यात विहिरीसाठी ब्लास्टिंग घेणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये जिलेटीनचा स्फोट, लहान मुलीसह 4 जण गंभीर जखमी, जालना जिल्ह्यातील लिंगसेवाडीतील घटना

18/06/2019,7:45AM
Picture

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार, साविधासभेत सुधीर मुनगंटीवार, तर विधानपरिषदेत दीपक केसरकर अर्थसंकल्प मांडणार

18/06/2019,7:32AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *