LIVE : हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्षांतराचा निर्णय घेणार

LIVE : हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्षांतराचा निर्णय घेणार
Picture

हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्षांतराचा निर्णय घेणार

इंदापूर : काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर, 4 सप्टेंबरला कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन, कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन पक्षांतराचा निर्णय जाहीर करणार

01/09/2019,6:07PM
Picture

अमित शाह सोलापुरात दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोलापूरमध्ये दाखल, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतरही नेते उपस्थित 

01/09/2019,4:54PM
Picture

अमित शाह उद्या मुंबईत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर, सकाळी सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार

01/09/2019,4:29PM
Picture

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनर उलटला

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनर उलटला, खंडाळा बोगद्याजवळ अपघात, कंटेनर उलटल्याने मुंबईकडे जाणाऱ्या तिन्ही लेन बंद, एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

01/09/2019,12:16PM
Picture

सोलापुरात काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांचा भाजपप्रवेश लांबणीवर

सोलापूर : जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रावादीच्या नेत्यांचा भाजपप्रवेश लांबणीवर, महाजानदेश यात्रेच्या मूळ उद्देशापेक्षा पक्षप्रवेशाची चर्चा होण्याच्या शक्यतेने पुढे ढकलला

01/09/2019,12:14PM
Picture

पुण्यातील राजगुरुनगर येथे तरुणावर गोळीबार

पुण्यातील राजगुरुनगर येथे तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. किरकोळ वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. निलेश टिळे असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.

01/09/2019,11:54AM
Picture

विरारमध्ये कोकण वासीयांची फसवणूक

विरारमध्ये तिकिटांच्या नावावर कोकण वासीयांची फसवणूक करण्यात आली आहे. एक महिन्यापासून तिकीट बुकिंग करुनही नागरिकांसाठी बस उपलब्ध नाही. काल (31 ऑगस्ट) 2 वाजल्यापासून 500 च्यावर लहान मोठे प्रवाशी विरारमध्येच अडकून पडले आहेत. भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या माध्यमातून 2000 च्या वर नागरिकांची बुकिंग केली होती. बुकिंग घेणारा राहुल गुप्ता नावाचा इसम लाखो रुपये घेऊन फरार झाला आहे.

01/09/2019,11:52AM
Picture

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती

01/09/2019,11:44AM
Picture

मालाडमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू

मालाडमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आहे. मालवणी येथील एमएचबी कॉलनीत ही घटना घडली. यामध्ये एकाच मृत्यू तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटामुळे घराची भिंत कोसळली आहे.

01/09/2019,11:41AM
Picture

जालन्यातील बलात्कार पीडितेवर घाईघाईत उरकले अंत्यसंस्कार

जालन्यातील त्या बलात्कार पीडितेवर घाईघाईत अंत्यसंस्कार उरकण्यात आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास औरंगाबादच्याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी दबाव टाकून अंत्यसंस्कार करायला लावले, असा आरोप मुलीच्या भावाने केला आहे.

01/09/2019,10:49AM
Picture

धुळे स्फोट प्रकरण : कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

धुळ्यातील शिरपूर येथील केमिकल कंपनीतील स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू, तर 72 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

01/09/2019,10:14AM
Picture

मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसला भीषण आग

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसला भीषण आग लागली आहे. संपूर्ण एसटी बस जळून खाक झाली आहे. ही घटना माणगाव येथे घडली. गणपतीसाठी चाकरमनी येत असताना ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

01/09/2019,10:06AM
Picture

मुंबईत रिमझीम पाऊस, कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत सकाळपासून रिमझीम पाऊस पडत आहे. तसेच कोकणातही चांगला पाऊस पडत आहे. गेल्या तीन ते चार दिवसात हवामान विभागाकडून कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

01/09/2019,10:03AM

Picture

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी झाली आहे. बोरघाटात मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. अम्रुतांजन पुलाजवळ दोन्ही दिशेला वाहतूक कोडी झाली आहे. त्यामुळे कोकणात आणि कोल्हापूर जाणाऱ्या चाकरमन्यांचे हाल होत आहेत.

01/09/2019,9:50AM
Picture

पिंपरी-चिंचवडमध्ये 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार

पिंपरी-चिंचवडमध्ये 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. या तरुणीला जबरदस्तीने रिक्षामध्ये कोंबले आणि एका अज्ञात ठिकाणी नेऊन सामूहिक बलात्कार केला. तीन अज्ञात इसमांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. निगडी पोलिसांनी या अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहे.

01/09/2019,9:59AM

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *