LIVE UPDATE- दिवसभरातील मोठ्या बातम्या 22/02/2019

सातारा – फलटणमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा सातारा:लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदार संघातून खा.शरद पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर फलटणमधून कार्यकर्ता संवाद मेळाव्याला सुरुवात, माढा लोकसभा अंतर्गत येणाऱ्या जिल्हयातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी मेळाव्यास उपस्थित पवारांसमोर कार्यकर्यांचा गोंधळ सातारा: फलटणमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा, मात्र पवारांसमोर कार्यकर्त्यांच्या गोंधळ, राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे आणि …

LIVE UPDATE- दिवसभरातील मोठ्या बातम्या 22/02/2019
सातारा - फलटणमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा
सातारा:लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदार संघातून खा.शरद पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर फलटणमधून कार्यकर्ता संवाद मेळाव्याला सुरुवात, माढा लोकसभा अंतर्गत येणाऱ्या जिल्हयातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी मेळाव्यास उपस्थित
पवारांसमोर कार्यकर्यांचा गोंधळ
सातारा: फलटणमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा, मात्र पवारांसमोर कार्यकर्त्यांच्या गोंधळ, राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे आणि त्यांचा कार्यकर्त्यांकडून गोंधळ,स्टेजवर जाण्यास शेखर गोरे यांचा नकार, पक्षाकडून गळचेपी होत असल्याचा शेखर गोरे समर्थकांचा आरोप
कोल्हापूर - धनंजय महाडिक यांचं स्पष्टीकरण
मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीकडूनच लोकसभा निवडणूक लढवणार. खासदार धनंजय महाडिक यांनी केलं पीटीआयच्या बातमीचं खंडन.खासदार महाडिक यांनी दिलं tv9 मराठीवर स्पष्टीकरण. नागरिकांनी संभ्रम निर्माण करून न घेण्याचं आवाहन. शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे यांच्यामुळेच संसदेत चांगली कामगिरी करू शकलो,महाडिक यांची प्रतिक्रिया
वर्थ्यातून रामदास तडस यांचा पत्ता कट?
वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार रामदास तडस यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, भाजपकडून सागर मेघे लढण्यास इच्छुक, पक्षाने तिकीट दिल्यास सागर मेघे लोकसभा लढणार, वडील दत्ता मेघेंची भूमिका, दत्ता मेघे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय
काँग्रेसचा पुणे, सांगलीचा उमेदवार ठरणार?
पुणे आणि सांगलीचा लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी पुण्यात काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक, काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या घरी बैठकीचे आयोजन, बैठकीला आमदार विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे, महिला आघाडीच्या कमल व्यवहारे, माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी उपमहापौर आबा बागूल, अभय छाजेड, शरद रणपिसे यांची उपस्थिती
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *