LIVE : राहुल, सोनिया आणि प्रियांका गांधींच्या सभेच्या तारखा ठरल्या

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एकाच ठिकाणी

marathi live update breaking news, LIVE : राहुल, सोनिया आणि प्रियांका गांधींच्या सभेच्या तारखा ठरल्या
marathi live update breaking news, LIVE : राहुल, सोनिया आणि प्रियांका गांधींच्या सभेच्या तारखा ठरल्या

राहुल, सोनिया आणि प्रियांका गांधींच्या सभेच्या तारखा ठरल्या

नवी दिल्ली : अखेर महाराष्ट्र विधानसभेसाठी राहुल गांधींच्या प्रचार सभेची तारीख ठरली, 13 ऑक्टोबरला राहुल गांधींची मुंबईत सभा, तर 14 आणि 15 ऑक्टोबरला सोनिया गांधी महाराष्ट्रात, 16 ऑक्टोबरला प्रियांका गांधी नांदेडमध्ये

09/10/2019,12:54PM
marathi live update breaking news, LIVE : राहुल, सोनिया आणि प्रियांका गांधींच्या सभेच्या तारखा ठरल्या

भुजबळांना मोठा धक्का, माणिकराव शिंदेचा शिवसेनेला पाठिंबा

नाशिक : छगन भुजबळांना मोठा धक्का, भुजबळांचे खंदे समर्थक माणिकराव शिंदे यांचा शिवसेना उमेदवार संभाजी पवार यांना पाठींबा, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माणिकराव शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली, शिक्षक आमदार किशोर दराडे , माजी आमदार मारोतराव पवार, माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या उपस्थित पाठींबा दिला

09/10/2019,12:42PM
marathi live update breaking news, LIVE : राहुल, सोनिया आणि प्रियांका गांधींच्या सभेच्या तारखा ठरल्या

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकणारे 2 वर्षांसाठी तडीपार

सांगली – स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकणे महागात, जिल्हाध्यक्ष महेश खराडेसह वाळवा तालुका अध्यक्ष भगवान जाधव यांना दोन वर्षांसाठी सांगली जिल्ह्यातून तडीपारीची दिली नोटीस, स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक

09/10/2019,10:17AM
marathi live update breaking news, LIVE : राहुल, सोनिया आणि प्रियांका गांधींच्या सभेच्या तारखा ठरल्या

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

नवी मुंबई : हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटी पनवेल लोकलच्या पेंटाग्राफला वाशी स्टेशनवर आग, अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी दाखल

09/10/2019,9:58AM
marathi live update breaking news, LIVE : राहुल, सोनिया आणि प्रियांका गांधींच्या सभेच्या तारखा ठरल्या

भाजप आमदाराची शिवसेना बंडखोर उमेदवाराविरोधात तक्रार

नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघातलं राजकीय वातावरण तापलं, शिवसेना बंडखोर आशिष जैसवाल यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, भाजपचे उमेदवार आ. मल्लीकार्जुन रेड्डी यांनी केली तक्रार, रेड्डी यांच्या आई आणि पत्नीबाबत अशोभनीय वक्तव्य केल्याने तक्रार दाखल, जैसवाल यांच्या वक्तव्यामुळे बदनामी झाल्याचाही आ. रेड्डी यांचा आरोप

09/10/2019,9:50AM
marathi live update breaking news, LIVE : राहुल, सोनिया आणि प्रियांका गांधींच्या सभेच्या तारखा ठरल्या

जेजुरीत मर्दानी दसरा

जेजुरी- जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात, हजारो भाविकांची उपस्थिती. 42 किलोचा खंडा उचलण्याची स्पर्धा, अनेक स्पर्धकांचा सहभाग

09/10/2019,9:52AM
marathi live update breaking news, LIVE : राहुल, सोनिया आणि प्रियांका गांधींच्या सभेच्या तारखा ठरल्या

मुख्यमंत्र्यांच्या मॅरेथॉन सभा

धुळे ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री आज धुळ्यात, नेर गावात सभेचं आयोजन, शिरपूरचे भाजपचे उमेदवार कांशीराम पावरा यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची शिरपुरात सभा, तर साक्री मतदारसंघातील उमेदवार मोहन सूर्यवंशी यांच्या प्रचारार्थ सायंकाळी सभा

09/10/2019,9:50AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *