LIVE: आंबेगाव सीमाभिंत दुर्घटना प्रकरणी 2 ठेकेदारांना अटक

दिवसभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी एका क्लिकवर फक्त टीव्ही 9 मराठीवर...

LIVE: आंबेगाव सीमाभिंत दुर्घटना प्रकरणी 2 ठेकेदारांना अटक
Picture

रत्नागिरीतील तिवरे धरण दुर्घेटनेत आतापर्यंत 18 मृतदेह सापडले

रत्नागिरीतील तिवरे धरण दुर्घेटनेत आतापर्यंत 18 मृतदेह सापडले, अजून 5 मृतदेहांचा शोध सुरु, सलग तिसऱ्या दिवशी एनडीआरएफची शोधमोहिम सुरु, 18 मध्ये 12 पुरुष तर 6 महिलांच्या मृतदेहाचा समावेश

05/07/2019,8:53AM
Picture

आंबेगाव सीमाभिंत दुर्घटना प्रकरणी 2 ठेकेदारांना अटक

आंबेगाव सीमाभिंत दुर्घटना प्रकरणी 2 ठेकेदारांना अटक, सत्यदेव रामराज चव्हाण आणि दिवाकर सत्यदेव चव्हाण असं दोघांचं नाव, दोघांनी बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना कामासाठी आणलं होतं, सीमाभिंतीजवळ कामगारांना झोपड्याही यांनीच बांधून दिल्या, भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

05/07/2019,8:47AM
Picture

राज्य उत्पादन शुल्क विभागाची नागपूरमध्ये मोठी कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाची नागपूरमध्ये मोठी कारवाई, सापळा रचून 1680 लिटर हातभट्टीची दारु आणि एक कार जप्त, उमरेड तालुक्यातील चांफा परिसरात हातभट्टीच्या दारुची तष्करी करणाऱ्या शेख हमीद शेख इस्त्राईलला अटक

05/07/2019,8:36AM
Picture

जालन्यातील भोकरदन तालुक्यात धामना मध्यम प्रकल्पाचा सांडवा ओव्हरफ्लो

जालन्यातील भोकरदन तालुक्यात धामना मध्यम प्रकल्पाचा सांडवा ओव्हरफ्लो, मध्यरात्रीपासून पाणी ओसंडून वाहत असल्याने ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण, धरणाचा पाणी साठा आणि सांडव्याच्या पाण्याच्या प्रवाहावर 24 तास लक्ष

05/07/2019,7:30AM
Picture

नागपुरातील मेयो रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाकडून सुरक्षा रक्षकांवर हल्ला

नागपुरातील मेयो रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाकडून सुरक्षा रक्षकांवर हल्ला, दारुच्या नशेत शिवीगाळ, महिला डॉक्टरांवरही हल्ल्याचा प्रयत्न, सुरक्षा रक्षकांकडून मद्यधुंद नातेवाईकाला चोप

05/07/2019,7:28AM
Picture

पालघर जिल्हाधिकारी आणि महापौरांकडून वसई तालुक्याच्या पुर परिस्थितीची पहाणी

पालघर जिल्हाधिकारी आणि महापौरांकडून वसई तालुक्याच्या पुर परिस्थितीची पहाणी, पीडित लोकांना शासनाकडून नुकसान भरपाई, महापालिका हद्दीतील रहिवाशांना घरपट्टीत मिळणार सुट

05/07/2019,7:25AM
Picture

स्पाईस जेटचे विमान धावपट्टीवरुन घसरले

स्पाईस जेटचे विमान धावपट्टीवरुन घसरले, मुख्य धावपट्टी बंद, अनेक उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल, अपघातानंतर प्रवाशांची व्यवस्था करण्यात हवाई कंपनी अपयशी

05/07/2019,7:20AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *