LIVE : आघाडीचे नेते राज्यपालांची वेळ मागणार

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, मोठ्या बातम्या, राजकारण, मुंबई, पुण्यासह सर्व बातम्यांचे लाईव्ह अपडेट एका क्लिक वर

LIVE : आघाडीचे नेते राज्यपालांची वेळ मागणार
Picture

आघाडीचे नेते राज्यपालांची वेळ मागणार

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांच्या सत्तास्थापनेसाठी हालचाली, आघाडीचे नेते राज्यपालांची वेळ मागणार

08/11/2019,8:08PM
Picture

उद्धव ठाकरेंचं ‘ते’ वक्तव्य चुकलंच : नितीन गडकरी

माझी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा झाली. मात्र, त्यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय झाला नसल्याचं म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा बाळासाहेब यांनी ज्याचे जास्त आमदार निवडून येणार त्याचा मुख्यमंत्री होणार हे सूत्र ठरलं होतं. सर्व ठिकाणी असंच ठरतं. शिवसेनेला कुणाशी युती करायची आहे हा त्यांचा निर्णय आहे. मात्र, विचारधारेचा विचार करता ज्या विचाराने बाळासाहेब ठाकरेंनी काम केलं त्यानुसार योग्य होणार नाही. उद्धव ठाकरेंनी पहिल्याच दिवशी आमच्याकडे सर्व पर्याय खुले असल्याचं म्हणणं हे योग्य नव्हतं. महाराष्ट्राच्या हितासाठी दोघांनी एकत्र येणं आवश्यक आहे- नितीन गडकरी

08/11/2019,6:04PM
Picture

50-50 मुख्यमंत्री ठरलं नाही - गडकरी

08/11/2019,6:02PM
Picture

संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

मुंबई : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना, भाजप-शिवसेनेतील घडामोडीला वेगळं वळणं येण्याची शक्यता

08/11/2019,3:51PM
Picture

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही शरद पवारांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही शरद पवारांच्या भेटीला

08/11/2019,3:48PM
Picture

संजय राऊत पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

08/11/2019,3:47PM
Picture

केवळ मुख्यमंत्रिपदाबाबतच चर्चा : शिवसेना

08/11/2019,3:45PM
Picture

मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद बोलावली, आज संध्या. 4.30 वाजता पत्रकार परिषद

08/11/2019,3:29PM
Picture

रामदास आठवले पवारांच्या भेटीला

रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी भेट, दोघांमध्ये सत्ता स्थापनेबाबत चर्चेची चिन्हं

08/11/2019,2:45PM
Picture

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार उद्धव ठाकरे यांची ठाम भूमिका

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार उद्धव ठाकरे यांची ठाम भूमिका

08/11/2019,2:30PM
Picture

महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी राज्यपालांंच्या भेटीला

महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी राज्यपालांंच्या भेटीला

08/11/2019,2:26PM
Picture

संभाजी भिडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला 'वर्षा'वर

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर, राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा करण्याची शक्यता

08/11/2019,12:21PM
Picture

शिवसेना खासदार आणि जिल्हा प्रमुखांची मुंबईत बैठक

मुंबई : शिवसेना खासदार आणि जिल्हा प्रमुखांची शुक्रवारी मुंबईत बैठक, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात बैठक

08/11/2019,12:18PM
Picture

शहापुरात मुसळधार पाऊस, भात शेतीचे मोठं नुकसान

शहापूर : शहापुरात सकाळपासून मुसळधार पाऊस, शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला, भात शेतीचे 100% नुकसान, बळीराजा चिंतेत

08/11/2019,12:17PM
Picture

अकोट तालुक्यात जोरदार पाऊस, पूल वाहून गेल्याने अकोट परतवाडा मार्ग बंद

अकोला : जिल्हातल्या अकोट तालुक्यात रात्री पासून जोरदार पाऊस, पावसामुळे अकोट ते परतवाडा रोडवरील पूल वाहून गेला, अकोट परतवाडा मार्ग बंद, रोडवर दूरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा,

08/11/2019,12:16PM
Picture

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला जाणाऱ्या टेम्पोचा अपघात, पाच पाच वारकऱ्यांचा मृत्यू

पंढरपूर : सांगोल्याजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोला अपघात, विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची धडक, अपघातात पाच वारकऱ्यांचा मृत्यू, पंढरपूरला कार्तिकी यात्रेसाठी जाताना अपघात, मृत वारकरी मंडोळी गावचे रहिवासी

08/11/2019,12:15PM
Picture

कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले, विकास ठाकरे, राजू पारवे जयपूरला रवाना

नागपूर : कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले, विकास ठाकरे, राजू पारवे जयपूरला रवाना, विमानाने दिल्लीमार्गे जयपूरला रवाना

08/11/2019,12:13PM
Picture

कल्याण-डोंबिवलीत अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवलीमध्ये आज सकाळच्या सुमारास पुन्हा एकदा परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, चाकरमान्यांची तारांबळ, मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे 15 ते 20 मिनटं उशिराने

08/11/2019,12:12PM
Picture

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर कारने पेट घेतला

पुणे : पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वेवर मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास कारने पेट घेतला, मुंबईवरून पुण्याला येताना मारुती वॉगनर गाडीने अचानक पेट घेतल्याने परिसरात खळबळ

08/11/2019,12:09PM
Picture

उल्हासनगरमध्ये फर्निचरच्या दुकानाला आग, दुकानाचं मोठं नुकसान

उल्हासनगर : फर्निचर बाजारातील फर्निचरच्या दुकानाला आग, आगीत दुकानाचं मोठं नुकसान, आगीचं करणार अद्याप अस्पष्ट, शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न

08/11/2019,11:55AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *