LIVE : पुण्यात नरेंद्र मोदी यांच्या सभेचं ठिकाण ठरलं

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर ...

LIVE : पुण्यात नरेंद्र मोदी यांच्या सभेचं ठिकाण ठरलं
Picture

पुण्यात नरेंद्र मोदींच्या सभेचं ठिकाण ठरलं

पुणे : पुण्यातील नरेंद्र मोदींच्या सभेचं ठिकाण ठरलं, टिळक रोडवरील एस.पी.कॉलेजच्या मैदानात मोदींची सभा, येत्या 17 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता मोदींची सभा, भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय

13/10/2019,11:50AM
Picture

पुण्यातील मोदींच्या सभेची जागा निश्चित

पुण्यातील नरेंद्र मोदी यांच्या सभेची जागा निश्चित, टिळक रोडवर एस. पी. कॉलेजच्या मैदानात सभेचं नियोजन, 17 ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजता मोदींची सभा

13/10/2019,11:05AM
Picture

मतदानाच्या जनजागृतीसाठी तरुणांची 'एक धाव भयमुक्त वसईसाठी मॅराथॉन'

वसई : मतदानासाठी जनजागृती करण्यासाठी एक धाव भयमुक्त वसईसाठी मॅराथॉन, सकाळी साडे नऊ वाजता वसई किल्ला ते अर्नाळा किल्ला पर्यंत 15 किलोमीटर धावत 50 च्यावर तरुणांकडून हातात मशाल घेऊन जनजागृती

13/10/2019,9:39AM
Picture

चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून मतदानासाठी जनजागृती

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा बिलबाराच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून झाडाचा पानावर मतदान जनजागृती, लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्साहात सहभागी होण्याचं आव्हान, बदामाच्या झाडाच्या पानावर मतदान जागृतीचे घोषवाक्य लिहून पालकांना दिलं, गावातही जनजागृती

13/10/2019,9:33AM
Picture

लॅमिंटन रोड परिसरातील आदित्य ऑर्किट इमारतीला आग

मुंबई : दक्षिण मुंबईतील लॅमिंटन रोड परिसरातील आदित्य ऑर्किट या कमर्शियल इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटना स्थळी दाखल, चौथ्या मजल्यावर अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

13/10/2019,9:29AM
Picture

शहापूरमध्ये दोन दुचाकिंमध्ये भीषण अपघात, पोलिसासह एकाचा मृत्यू

शहापूर : शेणवे रस्त्यावर शूळत्तर येथे दोन दुचाकिंची समोरासमोर धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी, जखमीवर कल्याणच्या रुग्णालयात उपचार सुरु, मृतांमध्ये एका पोलिसाचाही समावेश

13/10/2019,9:27AM
Picture

मीरा-भाईंदरमध्ये डम्पिंग ग्राऊंडला आग, तब्बल चार तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

मुंबई : मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत उत्तन परिसरातील डम्पिंग ग्राऊंडच्या ढिगाऱ्याला आग, रात्री 11.30 च्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या, 2 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल, अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्नानंतर अखेर चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

13/10/2019,9:22AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *