सिस्टर्स, वॉर्डबॉय आणि निवृत्त सैनिकांनो, योद्धे व्हा, देशाला तुमची गरज : मुख्यमंत्री

Covidyoddha@gmail.com या ईमेल आयडीवर आपला नाव, ठिकाण आणि संपर्क क्रमांक लिहून पाठवा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. (Uddhav Thackeray appeals Retired Soldiers to participate in fight against Corona)

सिस्टर्स, वॉर्डबॉय आणि निवृत्त सैनिकांनो, योद्धे व्हा, देशाला तुमची गरज : मुख्यमंत्री

मुंबई : आरोग्य सेवेचा अनुभव असणाऱ्या माजी सैनिकांनी मदतीसाठी पुढं यावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. वैद्यकीय प्रशिक्षण घेतलेले निवृत्त सैनिक किंवा निवृत्त सिस्टर्स, वॉर्डबॉय यांनाही ‘कोरोना’विरुद्धच्या युद्धात सामील होण्याची साद मुख्यमंत्र्यांनी घातली आहे. (Uddhav Thackeray appeals Retired Soldiers to participate in fight against Corona)

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एक सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 1100 च्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यादृष्टीने राज्य सरकार काय काय पावलं उचलत आहे, त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

निवृत्त सैनिक ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे, अशा माजी अधिकाऱ्यांनी पुढे यावं तुमची महाराष्ट्राला गरज आहे. निवृत्त सिस्टर किंवा वॉर्डबॉय किंवा ज्यांना वैद्यकीय प्रशिक्षण घेऊनही सेवेत भरती होण्याची संधी मिळाली नाही, अशा प्रशिक्षित व्यक्तींनी या युद्धात सामील व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

Covidyoddha@gmail.com या ईमेल आयडीवर आपला नाव, ठिकाण आणि संपर्क क्रमांक लिहून पाठवा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मात्र या आयडीवर आपल्या सूचना, सल्ले किंवा तक्रारी लिहून मेल ब्लॉक करु नका, असंही त्यांनी बजावलं.

केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज नको : मुख्यमंत्री

केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज करु नका. सर्वांवर भार आहे, केंद्रावर आहे, राज्यांवर आहेच, पण प्रत्येक माणसावर भार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray appeals Retired Soldiers to participate in fight against Corona)

या युद्धात जे कोणी उतरुन काम करत आहेत, त्या सर्वांना धन्यवाद देतो. या सर्वांच्या सोबतीने आपण हे युद्ध लढत आहोत. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्याचे काही फोटो आले, सर्व जण मास्क लावून, अंतर ठेवून बसले होते. कदाचित व्हिडीओ कॉन्फरन्सने घेतलेली ही पहिली मंत्रिमंडळ बैठक होती. सर्व मंत्री त्या त्या जिल्ह्यात होते, त्या सर्वांचे धन्यवाद. सर्वांच्या सूचना येत आहेत, सर्वजण टीमवर्क करत आहेत, त्या सर्वांना धन्यवाद द्यायचे आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

(Uddhav Thackeray appeals Retired Soldiers to participate in fight against Corona)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *