अशोक चव्हाण, गिरीश महाजन यांच्याविरोधात वंचितचे उमेदवार जाहीर, 122 जणांची दुसरी यादी

काश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने (VBA candidate first list) विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत (VBA candidate first list)  120 जणांची नावं आहेत.

अशोक चव्हाण, गिरीश महाजन यांच्याविरोधात वंचितचे उमेदवार जाहीर, 122 जणांची दुसरी यादी
Follow us
| Updated on: Sep 30, 2019 | 4:48 PM

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने (VBA candidate first list) विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत (VBA candidate first list)  120 जणांची नावं आहेत. पहिल्या यादीत 22 जणांची नावं होती.  त्यामुळे वंचितने आतापर्यंत 142 उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित उमेदवारही लवकरच जाहीर केले जाणार आहेत. एमआयएमने काडीमोड घेतल्यानंतर वंचितने स्वतःच सर्व जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. विशेष म्हणजे यादी जाहीर करताना उमेदवारांच्या जातीचाही वंचितने उल्लेख केला आहे.

वंचितने राज्यातील दिग्गज नेते, मंत्री, माजी मुख्यमंत्र्यांविरोधात उमेदवार दिले आहेत. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याविरोधात भोकर मतदारसंघातून वंचितने नामेदव आईलवार यांना उतरवलं आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात जामनेरमध्ये सुमीत चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

वंचितची पहिली उमेदवार यादी 

  1. सुरेश जाधव, शिराळा
  2. डॉ. आनंद गुरव, करवीर
  3. दिलीप पांडुरंग कावडे, दक्षिण कोल्हापूर
  4. बाळकृष्ण शंकर देसाई, कराड-दक्षिण
  5. बाळासाहेब चव्हाण, कोरेगाव
  6. दीपक शामदिरे, कोथरुड
  7. अनिल कुऱ्हाडे, शिवाजीनगर
  8. मिलिंद काची, कसबा पेठ
  9. शहानवाला जब्बार शेख, भोसरी
  10. शाकीर इसालाल तांबोळी, इस्लामपूर
  11. किसन चव्हाण, पाथर्डी-शेवगाव
  12. अरुण जाधव, कर्जत-जामखेड (VBA candidate first list)
  13. सुधीर शंकरराव पोतदार, औसा
  14. चंद्रलाल वकटुजी मेश्राम – ब्रह्मपुरी
  15. अरविंद सांडेकर – चिमूर
  16. माधव कोहळे – राळेगाव
  17. शेख शफी अब्दुल नबी शेख – जळगाव
  18. लालसू नागोटी – अहेरी
  19. मणियार राजासाब – लातूर शहर
  20. नंदकिशोर कुयटे – मोर्शी
  21. अड आमोद बावने – वरोरा
  22. अशोक विजय गायकवाड – कोपरगाव

26 तारखेपर्यंत अंतिम यादी (VBA candidate first list)

विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांबरोबर 288 जागा लढवणार आहोत. यादी फायनल करण्याचं काम सुरु असून पहिली यादी मंगळवारी जाहीर होईल. उर्वरित यादी 26 सप्टेंबरपूर्वी जाहीर केली जाईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी याआधी दिली होती.

“आमचं सँडविच करण्याचा डाव होता”

काँग्रेसकडे 144 जागांची मागणी केली होती. मात्र त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. सत्ताधारी सरकार दोन्ही पक्षातील दागी नेत्यांवर बोलत होते. चर्चेत खेळवत ठेवून आमचं सँडविच करण्याचा डाव होता. मात्र हे राजकारण लक्षात आल्यावर आम्ही चर्चा थांबवली, असा दावा आंबेडकरांनी केला. आघाडीबरोबर बोलायचं नाही, मित्रपक्षाला बरोबर घेऊन 288 जागा लढण्याची आमची भूमिका आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

संबंधित बातम्या 

उमेदवारांच्या जातीसह वंचितची पहिली यादी जाहीर 

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.