गतकाळातील चित्रपट अभिनेत्री निम्मी यांचं निधन

खेरच्या क्षणी आपल्याला मृत्यू चकवा देतोच. गुडबाय निम्मी जी, अशा शब्दात फिल्ममेकर महेश भट यांनी निम्मी यांना अलविदा केलं. (Bollywood Actress Nimmi Passed Away)

Bollywood Actress Nimmi Passed Away, गतकाळातील चित्रपट अभिनेत्री निम्मी यांचं निधन

मुंबई : कोणे एके काळी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या प्रख्यात अभिनेत्री निम्मी यांचं निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी मुंबईत एका खाजगी दवाखान्यात अखेरचा श्वास घेतला. दाग, बरसात, उडन खटोला, मेरे मेहबूब यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. (Bollywood Actress Nimmi Passed Away)

गेल्या काही वर्षांपासून निम्मी यांची प्रकृती खालावली होती. ‘सरला नर्सिंग होम’मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

“आपण भले मनातील इच्छा जिंकू शकाल, परंतु अखेरच्या क्षणी आपल्याला मृत्यू चकवा देतोच. गुडबाय निम्मी जी.” अशा शब्दात फिल्ममेकर महेश भट यांनी निम्मी यांना अलविदा केलं.

निम्मी यांचे खरे नाव ‘नवाब बानो’ होते. ‘शोमन’ राज कपूर यांनी नाव बदलून ‘निम्मी’ ठेवलं. ‘बरसात’ या गाजलेल्या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून राज कपूर यांनी निम्मी यांचा विचार केला होता. परंतु नर्गिस यांची वर्णी लागल्याने त्यांची संधी हुकली.

1950 ते 1960 या काळात निम्मी यांनी मोठा पडदा गाजवला होता. त्यांनी आन, दाग, कुंदन, उडन खटोला, मेरे महबूब, पूजा के फुल, भाई भाई, लव्ह अँड गॉड, आकाशदीप यासारख्या अनेक सिनेमात काम केलं.

निम्मी यांचे वडील मूळ मेरठचे. निम्मी यांचा जन्म आग्रामध्ये झाला. निम्मी यांची मातोश्री वहिदन यांनी त्या काळी चित्रपट क्षेत्रात मोठं नाव कमावलं होतं. (Bollywood Actress Nimmi Passed Away)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *