90 व्या वर्षी संपूर्ण संपत्ती दान, सामाजिक भान जपणारे खय्याम!

ष्ठ संगीतकार खय्याम  (Mohammed Zahur Khayyam) यांचे मुंबईतील सुजय रुग्णालयात 92व्या वर्षी निधन झालं. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना (Mohammed Zahur Khayyam)  रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

90 व्या वर्षी संपूर्ण संपत्ती दान, सामाजिक भान जपणारे खय्याम!

मुंबई : ज्येष्ठ संगीतकार खय्याम  (Mohammed Zahur Khayyam) यांचे मुंबईतील सुजय रुग्णालयात 92व्या वर्षी निधन झालं. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना (Mohammed Zahur Khayyam)  रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत सोमवारी 19 ऑगस्टला रात्री मालवली.

मनाचा ठाव घेणारं, आपल्या तरल संगीतावर ठेका धरायला लावणारा जादूई संगीतकार म्हणजे मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी अर्थात सगळ्यांचे लाडके खय्याम.

1947 मध्ये फिल्मी करिअर सुरु करणाऱ्या खय्याम यांनी अनेक गाण्यांना संगीत दिले. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती 1958 साली प्रदर्शित झालेल्या ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटानं.

कभी कभी, उमराव जान, फिर सुबह होगी,त्रिशूल, नुरी, रझिया सुल्तान अशा सुपरडुपर हिट चित्रपटांना त्यांना संगीत दिले आणि बघता बघता अभिनेता होण्यासाठी मुंबईत आलेल्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली.

कभी कभी आणि उमराव जान या दोन सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच आपल्या  कारकिर्दित अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला.

पद्मविभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री, दिनानाथ मंगेशकर पुरस्कार,  उत्तर प्रदेश सरकारचा पहिला संगीतकार नौशाद पुरस्कार असे पुरस्कार त्यांना मिळाले.

खय्याम महान  संगीतकार तर होतेच. पण त्यांनी नेहमीच  सामाजिक बांधिकली  जपत आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला. वयाच्या 90 व्या वर्षी 10 कोटींची संपूर्ण संपत्ती दान करणारे खय्याम, पुलवामा हल्ला झाल्यावर वाढदिवस साजरा न करणारे खय्याम अशा अनेक प्रसंगी त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी दाखवली.

आपल्या कारकिर्दित अनेक हिट गाणी त्यांनी संगीतबध्द केली. आजच्या युवापिढीसाठी ते आदर्श होते. अनेक ‘मैफिलीं’मध्ये ‘जान’ आणणारा संगीताचा जादूगार काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *