VIDEO : यूपीमध्ये दोन जवानांना हॉटेल कर्मचाऱ्यांकडून मारहाण

लखनौ : उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. येथे लष्कराच्या दोन जवानांना एका हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये जवळपास 7 ते 8 लोक मिळून या दोन जवानांना काठ्या-लाठ्यांनी बेदम मारहाण करत आहेत. या घटनेवेळी हे …

VIDEO : यूपीमध्ये दोन जवानांना हॉटेल कर्मचाऱ्यांकडून मारहाण

लखनौ : उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. येथे लष्कराच्या दोन जवानांना एका हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये जवळपास 7 ते 8 लोक मिळून या दोन जवानांना काठ्या-लाठ्यांनी बेदम मारहाण करत आहेत. या घटनेवेळी हे जवान साध्या कपड्यांमध्ये होते.

या दोन जवांनांपैकी एकाचं नाव अमित आहे. व्हिडीओमधील हिरव्या रंगाचा कुर्ता घातलेले जवान अमित हे या हल्लेखोरांशी दोन हात करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, जवळपास पाच-सहा लोक हे त्यांच्यांवर काठ्यांनी वार करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या मारहाणीत अमित हे गंभीर जखमी झाले आहेत.

दुसऱ्या जवानाच्या हातात एक लाल रंगाची बॅग आहे. हा जवान अमितला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीमध्ये दिसून येत आहे. मात्र, या जवानालाही हॉटेलमधील हे कर्मचारी काठ्यांनी मारहाण करतात. यामुळे ते देखील जवानही गंभीर जखमी झाले आहेत. या जवानांना किती अमानुषपणे मारहाण केली जात आहे, हे व्हिडीओवरुन कळून येतं.

हे दोघे जवान बागपतच्या एका हॉटेलमध्ये गेले होते. तिथे या जवानांचा हॉटेल कर्मचाऱ्यांशी शुल्लक कारणावरुन वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचं रुपांतर मारहाणीत झालं. ही मारहाण रस्त्यापर्यंत आली.

या घटनेनंतर दोन्ही पक्षांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत सात लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. जवान आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये कुठल्या कारणावरुन वाद झाला याबाबत सध्या काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *