मोदी-राहुलच्या नावाने कॉमेडी, ट्रेनमध्ये हसत-खेळत खेळणी विकणाऱ्याला अटक

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध बड्या राजकीय नेत्यांच्या नावाचा वापर करत कॉमेडी करुन, प्रसंगी मिमिक्री करुन, अनोख्या प्रकारे ट्रेनमध्ये खेळणी विकणाऱ्या अवधेश दुबे यांना गुजरातमधील सुरत पोलिसांनी अटक केली आहे. अवधेश दुबे यांना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि 3500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अवधेश दुबे यांचा ट्रेनमध्ये खेळणी …

मोदी-राहुलच्या नावाने कॉमेडी, ट्रेनमध्ये हसत-खेळत खेळणी विकणाऱ्याला अटक

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध बड्या राजकीय नेत्यांच्या नावाचा वापर करत कॉमेडी करुन, प्रसंगी मिमिक्री करुन, अनोख्या प्रकारे ट्रेनमध्ये खेळणी विकणाऱ्या अवधेश दुबे यांना गुजरातमधील सुरत पोलिसांनी अटक केली आहे. अवधेश दुबे यांना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि 3500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

अवधेश दुबे यांचा ट्रेनमध्ये खेळणी विकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अनोख्या पद्धतीने लहान मुलांची खेळणी विकताना अवधेश या व्हिडीओत दिसतात. हटके डायलॉगबाजी आणि राजकीय व्यंगात्मक विनोदांचा वापर करत अवधेश आपल्याकडील खेळणी विकतात.

अवधेश यांचा खेळणी विकतानाचा संवाद जसाच्या तसा :

इतना चलता है कि बच्चा तो छोड़ो बाप भी चुप हो जाएगा. कौन है बेबी है कि बेबा.. अच्छा मोदी जी हैं मुझे लगा आनंदी जी हैं. मोदी जी के लिए डोरेमॉन, नाम तो सुना ही होगा. 120 का बेचता हूं 100 के नीचे 99 में भी नहीं देता हूं. कैश नहीं है तो पेटीएम से लेता हूं. पांडे जी का बेटा हूं. खिलौने बेच के जीता हूं. बच्चों के लिए इतना नहीं सोचते हैं मैय्या. आपका खेलता है तो हमारा खाता है. हम इंडियन्स की खासियत है दूसरों की थाली में चावल लंबा ही दिखता है. ऐसे ही केजरीवाल को मोदी की थाली में दिख रहा था अब अपनी भी थाली छिन रही है. आप टेंशन मत लीजिए फोन नंबर दे दूंगा, ख़राब होगा तो फोन कर लीजएगा.. बता दूंगा कि कहां फेंकना है. पूरी बातचीत सुनने के लिए आप नीचे के ट्विटर लिंक देख सकते हैं.

अवधेश दुबे यांच्याविरोधात सीआर 1228/19 यू / एस 144 (ए), 145 (बी), 147 आरए अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुरतमधील प्रथम श्रेणी न्यायालयात अवधेश दुबेंना हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्यावरील आरोप मान्य केले. त्यांनंतर दुबेंना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि 3500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राच्या माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक (सुरत) ईश्वर सिंह यादव यांनी सांगितले की, अवधेश दुबेंवर आम्ही अनधिकृत विक्रीप्रकरणी गुन्हा केला आहे.

अवधेश दुबे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिया झाला आहे आणि आमच्यापर्यंतही हा व्हिडीओ पोहोचला. या व्हिडीओत अवधेश दुबे राजकीय नेत्यांवर मनोरंजक टिपण्णी करताना दिसतात. ग्राहकांना आपल्याकडील वस्तू विकण्यासाठी ते वापरत असलेले कसब नक्कीच प्रभावी आहे. असेही अवधेश दुबे म्हणाले.

अवधेश दुबे यांचा VIDEO इथे पाहा :

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *