मोठ्यांनी 1 ट्रक माती दिली, पोरांनी 4 किल्ले हुबेहूब बनवले!

विजय गायकवाड, टीव्ही 9 मराठी, विरार: दिवाळीच्या सुट्टीत व्हॉट्सअॅप-फेसबुकसह सोशल मीडियापासून दूर राहात, लहानग्यांना गडकिल्ल्यांची माहिती देण्यासाठी विरारमध्ये अनोखा प्रयोग करण्यात आला. सोसायटीतील मुलांनी सोसायटीतच 4 किल्ले हुबेहूब बनवले. मातीतून साकारलेले हे किल्ले सध्या आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. रायगड, सिंधुदुर्ग, विजय दुर्ग आणि प्रतापगड यांच्या हुबेहूब कलाकृती मातीतून साकारल्या आहेत. विरार पूर्व मनवेल पाडा परिसरात नाना …

मोठ्यांनी 1 ट्रक माती दिली, पोरांनी 4 किल्ले हुबेहूब बनवले!

विजय गायकवाड, टीव्ही 9 मराठी, विरार: दिवाळीच्या सुट्टीत व्हॉट्सअॅप-फेसबुकसह सोशल मीडियापासून दूर राहात, लहानग्यांना गडकिल्ल्यांची माहिती देण्यासाठी विरारमध्ये अनोखा प्रयोग करण्यात आला. सोसायटीतील मुलांनी सोसायटीतच 4 किल्ले हुबेहूब बनवले. मातीतून साकारलेले हे किल्ले सध्या आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. रायगड, सिंधुदुर्ग, विजय दुर्ग आणि प्रतापगड यांच्या हुबेहूब कलाकृती मातीतून साकारल्या आहेत.

विरार पूर्व मनवेल पाडा परिसरात नाना नानी पार्क 2 ही सोसायटी आहे. या सोसायटीतील 20 ते 25 मुलांनी दिवाळीच्या सुट्टीत, लहान मुलांना शिवरायांचा इतिहास माहित व्हावा, शिवरायांनी जिंकलेल्या गडकिल्ल्यांची दुर्गम अवस्था काय असते, किल्ले कसे सर केले असतील, याची जाणीव मुलांपर्यंत पोहोचावी यासाठी आपल्याच सोसायटीत 4 किल्ले बनविले आहेत.

सिंधुदुर्ग

स्थानिक नगरसेवक प्रशांत राऊत, बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते स्वप्नील पाटील यांनी या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी 1 ट्रक माती उपलब्ध करून दिली. सोसायटीतील लहान मुलं, राहिवाशांनी वेळ काढून रात्री 5 ते 6 दिवस मेहनत करून हे किल्ले बनविले आहेत.

रायगड

या किल्ल्यात  रायगड आहे.  रायगडावरील काही स्पॉट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये महादरवाजा, टकमक टोक, हिरकणी बुरुज, चीत दरवाजा, बाजारपेठ, होळीचा मॉल दाखविला आहे.  दुसरीकडे सिंधुदुर्ग अणि विजयदुर्ग आणि प्रतापगडही बनवण्यात आला आहे.

रायगड हा किल्ला अक्षय वांद्रे, सिद्धेश घाडीगावकर, अनिकेत साटम, दिवेश बोरकर यांनी बनविला आहे. सिंधुदुर्ग हा किल्ला अमित कुळये,प्रशांत जंगम, रमेश देवळेकर यांनी बनविला आहे. तर विजयदुर्ग हा किल्ला जितेंद्र जोंधळे, ध्रुव जोंधळे, हर्षिता धयाळकर यांनी बनविला आहे. प्रतापगड हा किल्ला  महेश देसाई, संतोष गावडे,  सुमित विश्वासराव या मुलांनी बनविला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *