रणबीरसोबत लग्न करण्याबाबत आलिया म्हणते...

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी नुकतंच इटलीत लग्न केलं. तर अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनस लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. शिवाय बॉलिवूडमध्ये अशीही चर्चा आहे की, अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर लग्न करणार आहेत. याबाबत आलियाला विचारलं असता, “चाहत्यांना 2019 पर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचं …

रणबीरसोबत लग्न करण्याबाबत आलिया म्हणते...

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी नुकतंच इटलीत लग्न केलं. तर अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनस लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. शिवाय बॉलिवूडमध्ये अशीही चर्चा आहे की, अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर लग्न करणार आहेत. याबाबत आलियाला विचारलं असता, चाहत्यांना 2019 पर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचं स्वत: अलियानेच सांगितलं.

 रविवारी लक्स गोल्डन रोज अवॉर्ड्स 2018 च्या सेटवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला आलियाने उत्तर दिलं. आलिया म्हणाली, माझ्या लग्नाची वाट पाहणाऱ्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.

सध्यातरी मी लग्नाचा विचार केलेला नाही. त्यामुळे 2018 मध्ये मी लग्न करणार नसून, माझ्या लग्नासाठी चाहत्यांना 2019 पर्यंत वाट पाहावी लागेल.असं आलियाने सांगितलं.

गेल्या अनेक दिवसांपासून आलिया आणि रणबीर यांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. तर सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नात दोघेही एकमेकांच्या हातात-हात घालून फिरताना दिसले होते.

येत्या काळात येणाऱ्या ब्रम्हास्त्र या सिनेमात आलिया आणि रणबीर एकत्र दिसणार आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ✨ (@aliabhatt_all_updates) on

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *