पुण्यात महिला पेशंटचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढण्याचा प्रकार

पुणे : पुण्यातील  प्रसिद्ध असणाऱ्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. हॉस्पिटलमध्ये एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिला पेशंटचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ छुप्या कॅमेऱ्याने काढण्यात आल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली आहे. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या प्रकरणात लंकेश उतेकर या आरोपीला कोरेगाव पार्क …

पुण्यात महिला पेशंटचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढण्याचा प्रकार

पुणे : पुण्यातील  प्रसिद्ध असणाऱ्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. हॉस्पिटलमध्ये एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिला पेशंटचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ छुप्या कॅमेऱ्याने काढण्यात आल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली आहे. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात लंकेश उतेकर या आरोपीला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेच्या पतीच्या तक्रारीवरुन लंकेश उतेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला जहांगिरी हॉस्पिटलमध्ये एमआरआय करण्यासाठी आली होती. तेव्हा हॉस्पिटलच्या चेंजिग रुममध्ये हा प्रकार घडला आहे. चेंजिग रुममध्ये कुणीतरी मोबाईल सुरू ठेवून चित्रीकरण करत आहे, असे पीडित महिललेला लक्षात येताच तिने ही गोष्ट तिचे पतीला सांगितली. त्यानंतर पतीच्या तक्रारीवरुन लंकेश उतेकर विरोधात विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, लंकेश हा वॉर्डबॉय नसून तो हाऊस किपिंग मधील कंत्राटी कर्मचारी आहे. आम्ही त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली आहे, अस जहांगीर हॉस्पिटलच्या वतीने ईमेलच्या माध्यमातून सांगण्यात आलं.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *