अंगणात खेळणाऱ्या मुलांचं भांडण, मोठ्यांचा हस्तक्षेप, सावत्र भावाची कुऱ्हाडीने हत्या

एका तरुणाने वर्ध्यात आपल्या चुलत भावाची कुऱ्हाडीने हत्या केली (Wardha borther Murder) आहे.

अंगणात खेळणाऱ्या मुलांचं भांडण, मोठ्यांचा हस्तक्षेप, सावत्र भावाची कुऱ्हाडीने हत्या

वर्धा : एका तरुणाने वर्ध्यात आपल्या चुलत भावाची कुऱ्हाडीने हत्या केली (Wardha borther Murder) आहे. ही धक्कादायक घटना वर्ध्यातील कारंजा तालुक्यातील खरसखांडा येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी रविशेखर नासरे याला पोलिसांनी अटक केली आहे. सुशील नासरे असं मृत तरुणाचे नाव (Wardha borther Murder) आहे.

खरसखांडा येथील सुशील अशोक नासरे आणि रविशेखर अशोक नासरे हे दोघेही उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे घरासमोरील अंगणात खेळत होते. खेळत असताना दोघांचेही शुल्लक कारणावरुन भांडण झाले. खेळण्यातील संवाद वादात बदलला तसाच तो मोठ्यांसाठी विसंवाद ठरला. यावेळी रवीशेखर सुशीलच्या घराबाहेर उभे राहून सुशील आणि त्याच्या आईला शिवीगाळ करु लागला. त्यामुळे सुशील घराबाहेर आला. सुशील बाहेर येताच रविशेखरने रागाच्या भरात त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले.

सुशीलवर वार केल्याने तो रक्तबंबाळ झाल. गावातील नातेवाईकांनी तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूर येथे पुढील उपचारासाठी नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रागाच्या भरात आपल्या भावाचीच हत्या केल्याची घटना गावात घडली. त्यामुळे सर्व गाव सुन्न झाले होते. दोघांचेही घर समोरा समोर आहे.

संबंधित बातम्या :

पोटच्या मुलीचं आजारपण असह्य, बीडमध्ये बापाने चिमुरडीला गळा दाबून संपवलं

नागपुरात चिमुरडीच्या डोळ्यादेखत आईची हत्या, बापाला अटक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *