जिटी एक्सप्रेसमधील दिव्यांग डब्यात गावगुंडांचा हैदोस, प्रवाशांसह टीसीला मारहाण, पोलिसांवर दगडफेक

प्रवासादरम्यान या गुंडांनी सशस्त्र धाक दाखवत प्रवाशांना मारहाण केली. हिंगणघाट रेल्वे स्थानकावर गाडी पोहोचल्यानंतर या गुंडांनी दिव्यांगांच्या डब्यावर दगडफेकही केली. या दगडफेकीत एक रेल्वे पोलीस, तीन प्रवासी जखमी झाले आहेत.

जिटी एक्सप्रेसमधील दिव्यांग डब्यात गावगुंडांचा हैदोस, प्रवाशांसह टीसीला मारहाण, पोलिसांवर दगडफेक

वर्धा : नागपूर येथून महादेवाची यात्रा करुन हिंगणघाटला जात असलेल्या चार गावगुंडानी (Guns Riot at Handicap Bogie) जिटी एक्सप्रेसमध्ये शनिवारी (22 फेब्रुवारी) चांगलाच हैदोस घातला. प्रवासादरम्यान या गुंडांनी सशस्त्र धाक दाखवत प्रवाशांना मारहाण केली. हिंगणघाट रेल्वे स्थानकावर गाडी पोहोचल्यानंतर या गुंडांनी दिव्यांगांच्या डब्यावर दगडफेकही केली. या दगडफेकीत एक रेल्वे पोलीस, तीन प्रवासी जखमी झाले आहेत.

इतकंच नाही तर सेवाग्राम रेल्वे स्थानकावर या गुंडांनी (Guns Riot at Handicap Bogie) रेल्वे गार्डसह टीसीलाही मारहाण केली. प्रकरणी रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे. तर तीन गुंड फरार आहे. शेख शाबीर असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नवी दिल्ली चेन्नई एक्स्प्रेस (जिटी) 12616 ही गाडी नागपूरवरुन निघत असताना जनरल डब्यात मोठ्या प्रमाणात गर्दीत असल्याने चार गावगुंड दिव्यांगांच्या डब्यात चढले. यानंतर त्यांनी डब्यातील प्रवाशांना सशस्त्र धाक दाखवत मारहाण केली. त्यांनी गाडीत मद्यपान आणि धूम्रपान केल्याचीही माहिती आहे.

नागपूरपासूनच या युवकांनी डब्यात धुडगूस घालायला सुरवात केली होती. सेवाग्राम रेल्वे स्थानकावर गाडी पोहोचताच हे गुंड डब्यात धुडगूस घालत असल्याचे रेल्वे गार्डच्या लक्षात आले. त्यामुळे तिकीट निरीक्षक आणि रेल्वे गार्ड या गुंडांना समजवायला गेले. मात्र, या गुंडांनी त्यानांही यांनी मारहाण केली. इतक्यावरच न थांबता सेवाग्राम येथून रेल्वे सुटल्यावर सेवाग्राम ते हिंगणघाट दरम्यान या गुंडांनी चार ते पाचवेळा चेन पुलिंग करत रेल्वे थांबली. या युवकांचा धुमाकूळ हिंगणघाट स्थानकापर्यंत सुरु होता. हिंगणघाट येथे गाडी स्थानकावर पोहोचताच या गुंडांनी पुन्हा प्रवाशांना मारहाण करायला सुरवात केली. त्यानंतर गाडीतून उतरल्यानंतर दिव्यांगांच्या डब्यावर दगडफेकही केली.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस अधिकारी एस. सी. झा घटनास्थळी पोहोचले. या गुंडांच्या दगडफेकीत पोलीस अधिकारी एस. सी. झा देखील जखमी झाले. तर राजस्थान येथील दिनेशकुमार मीना, रविकुमार बैरवा, पिंटू बैरवा हे जखमी झाले आहेत. या व्यतिरिक्त काही प्रवाशांना किरकोळ इजा झाल्याची माहिती आहे. गुंडांच्या दगडफेकीत गाडीच्या काचही फुटल्या आहेत.

धुमाकूळ घालणाऱ्या या गुंडांपैकी हिंगणघाट येथील शेख शाबीर याला ताब्यात घेण्यात आलं आहे. तर तिघे फरार आहेत. आरोपीविरुद्ध रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी (Guns Riot at Handicap Bogie) भादंवीच्या कलम 324 ,353 ,332, 34 तर भारतीय रेल्वे कायदा 153 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *