वर्ध्यात जिल्हा परिषद निवडणूक, भाजप सदस्य सहलीसाठी ताडोबा जंगलात

जिल्हा परिषदेत सध्या भाजपाकडे बहुमत आहे. मात्र भाजपाच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेत सर्वांना सहलीवर पाठवले (wardha zilla parishad election) आहे.

वर्ध्यात जिल्हा परिषद निवडणूक, भाजप सदस्य सहलीसाठी ताडोबा जंगलात
Follow us
| Updated on: Jan 05, 2020 | 11:46 PM

वर्धा : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची धामधूम सुरु (wardha zilla parishad election) आहे. वर्ध्यातही उद्या (6 जानेवारी) जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सर्व सदस्य एकत्र रहावे याकरिता भाजपच्या सर्व सदस्यांना ताडोबा येथे सहलीवर नेण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली (wardha zilla parishad election) आहे.

ही सहल आज (5 जानेवारी) दुपारी सदस्यांना घेऊन ताडोबा येथे गेली. सहल रात्रीच्या सुमारास हे सर्व सदस्य ताडोबा येथे पोहोचले. हे सर्व सदस्य सकाळी जंगल भ्रमंती करुन दमलेल्या सदस्यांना जंगलातीलच एका विश्राम गृहात राहण्यात आहे. यावेळी सर्व सदस्यांनी गाण्यांच्या भेंड्या खेळत मनसोक्त आनंद घेतला. यात भाजपसह मिक्षपक्षाचेही सदस्य सहभागी झाले होते.

यावेळी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावरही या सहलीत उपस्थित होते. ते ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे‘ या गाण्यात चांगलेच रंगलेले दिसून (wardha zilla parishad election) आले.

वाघाच्या प्रतीक्षेत बिबटाचे दर्शन

ताडोबा येथील जंगलात वाघाचे दर्शन होण्याचा इतिहास आहे. यामुळे येथे पर्यटक येतात. कदाचित याच आशेत सर्वच सदस्यांना ताडोबामध्ये नेण्यात आले. पण, वाघाच्या दर्शनात वाट बघत असलेल्या या सदस्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती आहे.

जिल्हा परिषदेत सध्या भाजपाकडे बहुमत आहे. मात्र भाजपाच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेत सर्वांना सहलीवर पाठवले (wardha zilla parishad election) आहे.

वर्धा जिल्हा परिषदेची सध्याची स्थिती

एकूण सदस्य – 52

भाजपा – 31 आणि रिपाई आठवले गट – 1 असे एकूण – 32

काँग्रेस – 13

राष्ट्रवादी – 2

शिवसेना – 2

बसपा – 2

शेतकरी संघटना – 1

वर्ध्यात उद्या 6 जानेवारीला अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आहे. वर्ध्यात महाविकासआघाडी एकत्र आली तरी भाजपाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे वर्ध्यात काहीही फरक पडणार नसल्याचं चित्र आहे. मात्र भाजपातील सदस्यांचा एक गट नाराज असल्याचंही बोलल जात आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागलं आहे. एवढंच नव्हे तर मागच्या कार्यकाळात हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात जिल्हापरिषद अध्यक्षपद देण्यात आले होते. यंदा आर्वी विधानसभा मतदारसंघात अध्यक्षपद जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा (wardha zilla parishad election) आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.