पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये सट्टाबाजाराची कुणाला पसंती?

मुंबई : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. पाचपैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांसाठी सर्वाधिक सट्टा लावला गेल्याची माहिती समोर आली आहे. सट्टाबाजारानुसार, राजस्थानमध्ये कांग्रेस येणार, तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळेल. पाचही राज्यांवर सुमारे 40 हजार कोटींचा सट्टा …

, पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये सट्टाबाजाराची कुणाला पसंती?

मुंबई : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. पाचपैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांसाठी सर्वाधिक सट्टा लावला गेल्याची माहिती समोर आली आहे. सट्टाबाजारानुसार, राजस्थानमध्ये कांग्रेस येणार, तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळेल. पाचही राज्यांवर सुमारे 40 हजार कोटींचा सट्टा लागला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही विधानसभा निवडणूक फार महत्त्वाची मानली जात आहे. कोणाला वाटतं भाजपला काँग्रेस पराभूत करेल, तर कोणाला वाटतं भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल. सर्वाधिक लक्ष राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन मोठ्या राज्यांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. या तिन्ही राज्यात भाजपची सत्ता आहे. या तीन राज्यांच्या निवडणुकीमुळे सट्टाबाजार देखील चांगलाच तेजीत आहे.

राज्यातील मतदार ज्या पक्षाच्या बाजूने बोलतात, तसे सट्टा लावणारे देखील भाव बदलतात. सट्टाबाजारात सध्या भाजपसाठी वाईट बातमी आहे. कारण सट्टाबाजारात राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येईल, असा अंदाज सट्टाबाजारात वर्तवला जात आहे.. तर छत्तीसगडमध्ये देखील भाजप फार कमी अंतराने विजयी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मध्य प्रदेश

सट्टाबाजारात मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 230 पैकी 117 ते 118 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. तर भाजपला 100 ते 102 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार येईल, अशी सट्टेबाजारात चर्चा आहे. मध्य प्रदेशातील अनेक मोठे मंत्री यंदा पराभूत होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. .

राजस्थान

सट्टाबाजारानुसार, 200 पैकी 127 ते 129 जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे, तर 54-56 जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे.

छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये राज्यात निकालाबाबत सट्टाबाजारात देखील साशंकता आहे. भाजपची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये रमन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. मात्र, तरीही रोजगार, विकासच्या बाबतीत भाजपला येथे थोडा धक्का बसण्याची चिन्ह आहेत. छत्तीसगडमध्ये 90 पैकी भाजपला 43 ते 45 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे, तर काँग्रेसला 38 ते 40 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. छत्तीसगडमध्ये सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार काँग्रेसच्या जागांच्या तुलनेत भाजप फक्त 5 जागांनी पुढे आहे.

सट्टाबाजारनुसार, राजस्थान सोडल्यास मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 40 आणि 60 चा खेळ आहे. अर्थात 40 टक्के भाजप जिंकण्याचा अंदाज, तर 60 टक्के कॉंग्रेस जिंकण्याचा अंदाज आहे. या साऱ्या अंदाजांवर सट्टाबाजारात तुफान पैसा लावला गेला आहे. तब्बल 40 हजार कोटींचा सट्टा लावल्याचे बोलले जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *