...आणि स्मृती इराणी आशा भोसलेंच्या मदतीला धावल्या

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसोबत 57 मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथग्रहण सोहळ्याला तब्बल 6 हजार पाहुण्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये सिनेसृष्टीतीलही अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भव्य-दिव्य अशा शपथग्रहण सोहळ्याला प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही हजेरी लावली. मात्र, हा सोहळा …

, …आणि स्मृती इराणी आशा भोसलेंच्या मदतीला धावल्या

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसोबत 57 मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथग्रहण सोहळ्याला तब्बल 6 हजार पाहुण्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये सिनेसृष्टीतीलही अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भव्य-दिव्य अशा शपथग्रहण सोहळ्याला प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही हजेरी लावली. मात्र, हा सोहळा पार पडल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि आशा भोसले या गर्दीत अडकल्या. त्यांना बाहेर पडायचा कुठलाही मार्ग मिळत नव्हता.

आशा भोसले यांना गर्दीत अडकलेलं बघून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी त्यांच्या मदतीला धावून आल्या. स्मृती इराणींनी आशा भोसले यांना गर्दीतून बाहेर पडण्यास मदत केली. त्यानंतर आशा भोसले यांनी स्मृती इराणींनी केलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार व्यक्त केले. त्यांनी शपथग्रहण सोहळ्यातील स्मृती इराणींसोबतचा एक फोटो ट्वीट केला.

“पंतप्रधानांच्या शपथग्रहण सोहळ्यानंतर मी गर्दीत अडकली होती. स्मृती यांच्याव्यतिरिक्त कुणीही माझ्या मदतीसाठी धावून आलं नाही. मी अडचणीत असताता केवळ स्मृती यांचं माझ्याकडे लक्ष गेलं, तसेच मी सुरक्षितरित्या घरी पोहोचावं, याचीही त्यांनी काळजी घेतली. त्यांना काळजी आहे आणि म्हणूनच त्या जिंकून आल्या आहेत”, असं ट्वीट आशा भोसले यांनी केलं.

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *