'कोरोना'विरोधी लढ्यात भारताने जगाला मार्ग दाखवावा, 'WHO'कडून कौतुकाची थाप

सार्वजनिक आरोग्यासह समाज पातळीवरही भारताने आक्रमक कृती करणे चालूच ठेवले आहे हे खरोखर महत्वाचे आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले (WHO praises India fight against Corona)

'कोरोना'विरोधी लढ्यात भारताने जगाला मार्ग दाखवावा, 'WHO'कडून कौतुकाची थाप

जीनिव्हा : ‘कोरोना’विरोधी लढ्यात भारतासारख्या देशांनी जगाला मार्ग दाखवला पाहिजे, अशा शब्दात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताच्या पाठीवर कौतुकाची थाप ठोकली आहे. (WHO praises India fight against Corona)

भारतासारख्या देशांनी जगाला मार्ग दाखवला पाहिजे. प्रसंगी आक्रमक व्हावं लागतं. सर्वसामान्यांपासून देशाच्या प्रमुखांपर्यंत सार्वजनिक आरोग्य राखणाऱ्या कृती गंभीर परिणामकारक ठरु शकतात, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं.

कांजिण्या आणि पोलिओ निर्मूलनात भारताने जगाचे नेतृत्व केले; सार्वजनिक आरोग्यासह समाज पातळीवरही भारताने आक्रमक कृती करणे चालूच ठेवले आहे हे खरोखर महत्वाचे आहे, अशा शब्दात भारताचा गौरव करण्यात आला.

‘कोरोनाविरोधी लढ्यात भारत सरकारची कामगिरी खूपच प्रभावशाली आहे. प्रत्येकजण संघटित झाला आहे, हे पाहून मी खूप प्रभावित झालो’ असं भारतातील WHO चे प्रतिनिधी हेन्क बिकेडम याआधीही म्हणाले होते.

भारतात 30 राज्यं लॉक डाऊन करण्यात आली आहेत. 728 पैकी 606 जिल्ह्यांच्या सीमा सील आहेत. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस जनता कर्फ्यू पाळून सर्व देशवासियांना एक दिवस घरी थांबण्याचं आवाहन केलं होतं. (WHO praises India fight against Corona)

जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार 24 मार्चला सकाळी 9 वाजेपर्यंत जगभरात 3 लाख 34 हजार 981 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 14 हजार 652 कोरोना रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाचा प्रसार 190 देशांमध्ये झाला आहे. भारतात 434 कोरोनाग्रस्त असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून आकडा शंभरच्या उंबरठ्यावर आहे.

चीनमध्ये सर्वाधिक 81 हजार 603 कोरोनाग्रस्त असून 3 हजार 276 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर इटली देशात 59 हजार 138 कोरोनाबाधित रुग्ण असून 5 हजार 476 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. म्हणजेच चीनपेक्षा इटलीमध्ये बळींची संख्या अधिक आहे. (WHO praises India fight against Corona)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *