शाओमीचा 48 मेगापिक्सल फोन, किंमत फक्त...

मुंबई : शाओमी 48 मेगापिक्सलचा नवा फोन लवकरच लाँच करणार आहे. हा फोन जानेवारी 2019 मध्ये लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजूनपर्यंत कंपनीने या स्मार्टफोनच्या मॉडलचं नाव सांगितले नसून, हा 48 मेगापिक्सलचा फोन रेडमी रेज सोबत लाँच होणार आहे. या नव्या फोनमध्ये इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असल्याचे बोललं जात आहे. असा सेल्फी कॅमेरा सॅमसंग …

, शाओमीचा 48 मेगापिक्सल फोन, किंमत फक्त…

मुंबई : शाओमी 48 मेगापिक्सलचा नवा फोन लवकरच लाँच करणार आहे. हा फोन जानेवारी 2019 मध्ये लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजूनपर्यंत कंपनीने या स्मार्टफोनच्या मॉडलचं नाव सांगितले नसून, हा 48 मेगापिक्सलचा फोन रेडमी रेज सोबत लाँच होणार आहे.

या नव्या फोनमध्ये इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असल्याचे बोललं जात आहे. असा सेल्फी कॅमेरा सॅमसंग आणि ऑनरच्या फोनमध्येही देण्यात आला आहे. नुकतेच सॅमसंग गॅलेक्सी A8s आणि हुवेई नोवा 4 लाँच करण्यात आला होता. या दोन्ही फोनच्या डिस्प्लेवर एक होल दिला आहे. ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा आहे. शाओमी रेडमीचा हा पहिला फोन असेल ज्यामध्ये इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा दिला आहे.

आता प्रश्न असा आहे की, 48 मेगापिक्सलच्या स्मार्टफोनची किंमत किती असेल. मात्र कंपनीने या बद्दल अजून अधिकृत माहिती दिलेली नाही. जिगमोचाइनच्या वृत्तानुसार चीनमध्ये या फोनची किंमत दोन हजार युआन (अंदाजे 21 हजार रुपये) असेल.

काही दिवसांपूर्वी शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि ग्लोबल उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांनी सांगितले होते की, कंपनी लवकरच एक नवीन फोन लाँच करणार आहे. ज्यामध्ये स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर आणि 48 मेगापिक्सल कॅमेरा दिला जाईल. जुलैमध्ये सोनीने Sony IMX586 सेंसर लाँच केला होता, जो 48 मेगापिक्सलचा होता. कंपनीने सप्टेंबरमध्ये OEMs (ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर) च्या या सेंसरची शिपिंग सुद्धा चालू केली होती. यावरुन शाओमी सुद्धा आपल्या फोनमध्ये हा सेंसर वापरणार असल्याचं बोललं जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *