लग्नाला नकार, घराची कडी लावून तरुणाने मुलीचं घर पेटवलं, चौघांचा मृत्यू

लग्नासाठी नकार दिला म्हणून एका तरुणाने मुलीच्या घराला आग लावली. यामध्ये मुलीच्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

Andhra Pradesh Crime, लग्नाला नकार, घराची कडी लावून तरुणाने मुलीचं घर पेटवलं, चौघांचा मृत्यू

हैद्राबाद : लग्नासाठी नकार दिला म्हणून एका तरुणाने मुलीच्या घराला आग लावली (Andhra Pradesh Crime). यामध्ये मुलीच्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. ही घटना आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कडियाम मंडळच्या दुल्ला गावात घडली. या प्रेमवेड्याचं नाव श्रीनू आहे, तो फक्त 19 वर्षांचा आहे (Andhra Pradesh Crime).

श्रीनूचं गावातील नागमणी नावाच्या मुलीवर प्रेम होतं. मात्र, नागमणीच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला नकार दिल्याने श्रीनूने मध्यरात्री तिच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावली. मंगळवारी रात्री (21 जानेवारी) श्रीनूने पेट्रोल पंपावरुन पेट्रोल घतले. त्यानंतर तो नागमणीच्या घरी गेला. रात्रीची वेळ असल्याचे नागमणीचे कुटुंबीय झोपलेले होते. त्यानंतर श्रीनूने घरचा दरवाजा बाहेरुन बंद केला, घरावर पेट्रोल टाकून आग लावली. आग लागल्याचं कळताच नागमणीचं कुटुंब घराबाहेर येण्याचा प्रयत्न करत होते, मात्र दरवाजा बंद असल्याने ते बाहेर येऊ शकले नाही.

या घटनेत दोन चिमुकले आगीच्या भक्षस्थानी पडले. तर चारजण गंभीर जखमी झाले होते, उपचारादरम्यान या चौघांपैकी दोघांचा मृत्यू झाला. त्यांचं शरीर 80 टक्के भाजलं होतं. सध्या इतर दोन मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

श्रीनूचं नागमणीवर प्रेम होते. श्रीनूने नागमणीच्या घरच्यांकडे तिच्याशी लग्नाची इच्छा व्यक्त केली. यावेळी नागमणीच्या घरच्यांनी त्याचा लग्नासाठी होकार दिला, मात्र, नंतर श्रीनूच्या वागणुकीला कंटाळून नागमणीने लग्नाला नकार दिला. कुटुंबियांनी नागमणीचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून दिलं. तिच्या लग्नाला आता एक वर्ष झालं आणि ती तिच्या सासरी राहते.

यापूर्वीही घरच्यांवर हल्ला

श्रीनूने गेल्या 17 जानेवारीला मध्य रात्री नागमणीच्या आईवर चाकूने हल्ला केला होता. त्याची तक्रारही पोलिसांत दाखल करण्यात आली. मात्र, पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही, असा आरोप आहे. यादरम्यान नागमणीची मोठी बहीण आईची विचारपूस करण्यासाठी मुलांसोबत माहेरी आली होती. या घटनेत तिचाही बळी गेला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *