कॉफीसोबत ‘हे’ तेल घ्या आणि लठ्ठपणापासून सूटका मिळवा!

आज जगातील प्रत्येक तिसरा व्यक्ती हा लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहे. सध्या भारताच्या लोकसंख्येच्या 5 टक्के लोकांचे वजन सामान्य वजनापेक्षा जास्त आहे. दिवसेंदिवस लठ्ठ लोकांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

कॉफीसोबत ‘हे’ तेल घ्या आणि लठ्ठपणापासून सूटका मिळवा!
Follow us
| Updated on: Jul 10, 2019 | 12:07 AM

मुंबई : लठ्ठपणा ही आजच्या जीवनपद्धतीतील सर्वात मोठी समस्या आहे. सध्याच्या आधुनिक लाईफस्टाईलमुळे शरीराची हालचाल कमी झाली आहे, तसेच खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. त्यामुळे अनेकांना लठ्ठपणा या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. आज जगातील प्रत्येक तिसरा व्यक्ती हा लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहे. सध्या भारताच्या लोकसंख्येच्या 5 टक्के लोकांचे वजन सामान्य वजनापेक्षा जास्त आहे. दिवसेंदिवस लठ्ठ लोकांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. ही टक्केवारी देशाच्या भविष्यासाठी धोकादायक ठरु शकते.

देशातील तरुणांमध्येही लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जेव्हा वजन वाढतं, तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, नंतर ते कमी करण्यासाठी निरनिराळे प्रयोगही करतो. कधी डाएट करतो, कधी योगा करतो तर कधी जिममध्ये तासंतास घाम गाळतो. तरी आपल्या जीनवपद्धतीमुळे आपल्या शरीरावर या सर्व गोष्टींचा फार कमी परिणाम होतो. लवकर वजन कमी करण्यासाठी अनेकजण औषधींचाही आधार घेतात, हे अत्यंत धोकादायक ठरु शकतं. कारण, औषधी घेतल्यानंतर तेवढ्या वेळासाठी तुमचं वजन कमी होतं आणि औषधी बंद केल्यास ते पुन्हा वाढतं. तसेच, शरीरावर याचे साईड इफेक्ट्सही होतात.

जर व्यायाम आणि डाएट करुनही तुमचं वजन नियंत्रणात येत नसेल. तर तुम्ही एक घरगुती उपाय ट्राय करु शकता. तो घरगुती उपाय म्हणजे कॉफी. हो… तीच कॉफी जी तुम्हा घरापासून ते ऑफिसपर्यंत रोज पिता. याचं कॉफीमुळे तुम्ही तुमचं वाढलेलं वजन कमी करुन हवी तशी शरीरयष्टी मिळवू शकता.

जिम आणि डाएटसोबतच जर तुम्ही कॉफीमध्ये नारळाचं तेल मिसळून त्याचं सेवन कराल, तर तुम्ही परफेक्ट बॉडी मिळवू शकता. एका अभ्यासानुसार, रोज ब्लॅक कॉफीमध्ये नारळाचं तेल मिसळून त्याचं सेवन केल्याने वजन लवकर कमी होतं. त्याशिवाय शरीरातील गूड कोलेस्ट्रॉलची लेवलही वाढते. तसेच, यामुळे शरीरातील मेटाबॉलिजम रेटमध्येही सुराधणा होते. यामुळे वजन लवकर कमी होतं.

कॉफीसोबत नारळाच्या तेलाचं सेवन कसं कराल?

सर्वात आधी एका कपमध्ये 2 चमचे नारळाचं तेल घ्या. त्यामध्ये तयार करुन ठेवलेली विना दुधाची म्हणजेच ब्लॅक कॉफी घाला. कॉफी गरम असावी हे सुनिश्चित करा. जेणेकरुन कॉफी आणि नारळाचं तेल व्यवस्थित एकजीव होईल. त्यानंतर या कॉफीचं सेवन करा. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही विनासाखरेची कॉफीही घेऊ शकता. यामुळे तुमचं वजन लवकर कमी होण्यास मदत होईल.

नोट : वजन कमी करण्यासाठी वर दिलेल्या घरगुती उपायाचा आहारात समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

संबंधित बातम्या :

धुम्रपानच नाही, तर लठ्ठपणामुळेही कॅन्सर होतो : सर्व्हे

वजन कमी करण्यासाठी किती ग्रीन टी प्यायला हवी?

पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

दररोज नारळ पाणी प्या, व्यायाम न करता 10 किलो वजन घटणार, पाहा कसं?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.