Contraceptive pills : गर्भनिरोधक गोळ्यांबद्दल ‘या’ गोष्टी खोट्या आहेत, वाचा तज्ज्ञांचं मत

देशात लैंगिक शिक्षणाची कमतरता आहे आणि यामुळे लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता नाही आहे.

Contraceptive pills : गर्भनिरोधक गोळ्यांबद्दल 'या' गोष्टी खोट्या आहेत, वाचा तज्ज्ञांचं मत
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 1:29 PM

मुंबई : देशात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना आणि तरुणांमधील प्रेम प्रकरणांच्या घटना वारंवार वाढताना दिसत आहेत. पण असं असलं तरी देशात लैंगिक शिक्षणाची कमतरता आहे आणि यामुळे लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता नाही आहे. याबाबत अनेक गैरसमज अजुनही कायम आहेत. खरंतर, चुकीच्या माहितीमुळे स्त्रियांना गर्भनिरोधक गोळ्यांबद्दलही अनेक गैरसमज आहे. ज्याने शरीराला सगळ्यात मोठा धोका आहे. (contraceptive pills is safe know about myth of you should not believe)

फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयाच्या सल्लागार स्त्रीरोगतज्ज्ञ नेहा बत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भनिरोधक गोळ्यांच्या (Contraceotive Pills) गैरसमजांमुळे पुरुष व स्त्रिया गर्भनिरोधक पद्धतीचा वापर टाळतात. यामुळे नको असलेली गर्भधारणा आणि महिलांना शारीरिक आणि मानसिक धोका असतो.

कशा वापरायच्या गर्भनिरोधक गोळ्या ?

जर या गोळ्या योग्यरित्या वापरल्या तर याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्या अत्यंत प्रभावी आणि फायदेशीर आहेत. यासाठी दररोज एक गोळी घ्यावी लागते. जर तुम्ही एखादी गोळी चुकवली तर त्याचा फार काही परिणाम शरीरावर होत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, गर्भनिरोधक गोळ्या घेताना महिलांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

गर्भनिरोधक गोळ्यांबद्दल चुकीची माहिती

1. सर्व गर्भनिरोधक गोळ्यामुळे वजन वाढत : गर्भनिरोधक गोळ्या खाल्यामुळे वजन वाढतं अशी अनेकांची समज आहे. पण नवीन पद्धतीने बनवलेल्या गोळ्या खाल्ल्याने वजन वाढत नाही, तर त्याचे अनेक चांगले फायदे आहेत. पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम (पीसीओएस) असलेल्या रुग्णांमध्ये वजन कमी करण्यासाठी या गोळ्या काम करतात.

2. गर्भनिरोधक गोळ्यामुळे केसांची वाढ थांबते : गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये प्रोजेस्टेरॉन वेगवेगळ्या प्रमाणात तयार होतो, ज्यामुळे शरीरात टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होतं. पण यामुळे केसांची वाढ थांबत नाही.

3. गोळ्या चुकवणं ठीक आहे का? : सायकल दरम्यान गोळ्या न खाल्याने अवांछित गर्भधारणा होऊ शकते. त्यामुळे तुम्ही गोळ्या चुकवल्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. (contraceptive pills is safe know about myth of you should not believe)

संबंधित बातम्या – 

Almond Benefit | मधुमेह आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी लाभदायी ‘बदाम’, अशाप्रकारे करा वापर…

Kissing Benefits | चुंबनाने केवळ मूडच नाही, तर आरोग्यही सुधारते! वाचा ‘Kiss’चे आश्चर्यकारक फायदे…

Health Care | एनर्जी ड्रिंकमध्ये अल्कोहोल मिसळण्याची सवय? आरोग्यासाठी ठरू शकते अतिशय घातक!

(contraceptive pills is safe know about myth of you should not believe)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.