Fitness | रोजचा व्यायामही ठरू शकतो शरीराला घातक, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…

अमेरिकन फिटनेस फर्म 'एलआयटी मेथड' च्या मते, दररोज जिममध्ये घाम गाळणे आरोग्याला होणारा फायदा कमी करून, तोटा वाढवू शकतो.

Fitness | रोजचा व्यायामही ठरू शकतो शरीराला घातक, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात...
, दररोज जिममध्ये घाम गाळणे आरोग्याला होणारा फायदा कमी करून, तोटा वाढवू शकतो.

मुंबई : आपल्याला वजन कमी करायचे असेल किंवा टाईप-2 मधुमेह आणि हृदयविकारापासून दूर रहायचे असेल तर तज्ज्ञांनी आहारावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच नियमित व्यायामासाठी वेळ राखून ठेवण्याची शिफारस केली आहे. तथापि, अमेरिकन फिटनेस फर्म ‘एलआयटी मेथड’ च्या मते, दररोज जिममध्ये घाम गाळणे आरोग्याला होणारा फायदा कमी करून, तोटा वाढवू शकतो. दोन हजाराहून अधिक लोकांचा अभ्यास करून आठवड्यातून एकदा तरी व्यायामापासून ब्रेक घेण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे (Everyone needs to take a break from regular exercise).

ऊतींना स्थावर होण्याचा वेळ मिळेल

मुख्य संशोधक टेलर नॉरिस यांच्या मते, व्यायामादरम्यान हाडे आणि स्नायूंवर खूप दबाव येतो. अशा वेळी ऊती फुटण्याचा धोका निर्माण होतो. तथापि, जर व्यक्ती आठवड्यातून एक दिवस ब्रेक घेत असेल तर ऊतींना आराम मिळतो, तसेच शरीराची दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. नॉरिसने असेही म्हटले आहे की, जर शरीर दररोज वेगाने व्यायाम करत असेल आणि शरीराच्या ऊतकांची दुरुस्ती करण्याची संधी मिळत नसेल तर हाडे आणि स्नायूंमध्ये क्षय होण्याची समस्या उद्भवू शकते. यामुळे व्यक्तीला फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता असते.

स्नायूंच्या दुखापतीची भीती कमी होईल

अभ्यासाच्या वेळी असे दिसून आले आहे की, व्यायामाच्या नियमिततेत ब्रेक नसल्यामुळे देखील शरीर अस्वस्थ होते. यामुळे व्यक्ती केवळ स्नायूंच्या ताण आणि सांधेदुखीच्या समस्येसोबतच संघर्ष करत नाही तर भावनिक पातळीवरही सुस्त वाटते. त्या पातळीवर पोहोचल्यावर व्यायामापासून दूरच राहणे देखील आवश्यक असू शकते. नॉरिसने असा दावा केला आहे की, मोठ्या खेळाडूंनीही व्यायामातून ब्रेक घेण्याला त्यांच्या सराव पद्धतीचा भाग बनवणे आवश्यक मानले आहे. व्यायामानंतर मेंदूलाही विश्रांतीची आवश्यकता असते. यावेळी शरीरात स्ट्रेस हार्मोन ‘कोर्टिसोल’ चा स्राव वाढतो. हे मेंदूला एक संदेश देते की, शरीर कठीण परिस्थितीतून जात आहे (Everyone needs to take a break from regular exercise).

नवीन ऊर्जा मिळेल

व्यायामाचा ब्रेक स्नायूंच्या घनतेत वाढ करण्यात देखील प्रभावी आहे. हे शरीरास नवीन उर्जेसह व्यायाम करण्यास प्रेरित करते. ब्रेक डे दरम्यान चांगली झोप घ्या आणि आवडते चित्रपट पहा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. जेणेकरुन ‘फील बी टू’ हार्मोन रिलीज होईल आणि ऊती दुरुस्तीची गती वेगवान होईल.

व्यायामात मन टिकून राहील

व्यायामातून घेतलेला ब्रेक आपला आपला नियमित व्यामातला कंटाळा दूर करतो, असे अभ्यासात दिसून आले आहे. तथापि, यामुळे व्यायामाकडे व्यक्तीची अधिक आवड निर्माण होते. व्यायामामुळे व्यक्तीच्या शरीरात आणि मनामध्ये चांगले बदल होतात.

(Everyone needs to take a break from regular exercise)

हेही वाचा :

Published On - 6:49 pm, Wed, 3 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI