अॅसिडीटीमुळे त्रस्त आहात? मग, ‘हा’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

बडीशेप अॅसिडीटीवर रामबाण उपाय आहे. बडीशेपमुळे आपली अॅसिडीटीची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:57 PM, 13 Apr 2021
अॅसिडीटीमुळे त्रस्त आहात? मग, 'हा' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!
अॅसिडीटीमुळे त्रस्त आहात?

मुंबई : बडीशेप ही जवळजवळ प्रत्येक घरात असते. माऊथ फ्रेशनर अर्थात मुखवास म्हणून वापरली जाते. बडीशेपच्या गोड चव आणि सुगंधामुळेच लोक ती माऊथ फ्रेशनर म्हणून वापरतात. बडीशेप विविध पदार्थांची चव वाढवण्यासोबतच औषध म्हणून देखील वापरली जाते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, बडीशेप अॅसिडीटीवर रामबाण उपाय आहे. बडीशेपमुळे आपली अॅसिडीटीची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते.  (Follow these homemade tips to overcome the problem of acidity)

नक्की ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय!

– तीन चमचा बेडीशेप घ्या अगोदर ती स्वच्छ पाण्याने धुवा आणि पाण्यात उकळवा त्यानंतर हे पाणी काही वेळेसाठी थंड होऊद्या आणि मग प्या यामुळे तुमची अॅसिडीटीची समस्या दूर होईल. दररोज आठ दिवस आपण असे केले तर अॅसिडीटी होणार नाही.

– दुधाबरोबर बडीशेप घेतल्यास आपल्याला आरोग्याचे आणखी बरेच फायदे मिळतात. हे बडीशेप दूध बनवणे अतिशय सोपे आहे. यासाठी एका ग्लास दुधात एक चमचा बडीशेप घाला आणि हे दूध चांगले उकळा. कोमट झाल्यानंतर दूध प्या (Follow these homemade tips to overcome the problem of acidity).

– तुम्हाला लठ्ठपणाची समस्या असेल तर तुम्ही आजपासून बडीशेप खायला सुरूवात करा. दोन कप पाण्यात एक चमचा बडीशेप घालून उकळून घ्या आणि हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. यामुळे तुमचं अपचन दूर होईल आणि तसंच वजन कमी होण्यासही मदत होईल.

– बडीशेप नियमितपणे सेवन केल्याने आपल्या शरीरास झिंक, कॅल्शियम आणि सेलेनियमसारखे खनिजे मिळतात जे शरीरात हार्मोन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा संतुलित राखण्यास मदत करतात. त्याचा कूलिंग इफेक्ट चेहऱ्यावरही चमक आणतो.

– डोळे अशक्त झाले असतील, तर मूठभर बडीशेप आपल्यासाठी वरदान ठरू शकते. बडीशेपमध्ये व्हिटामिन ए असते, जे डोळ्यांच्या दृष्टीस उपयुक्त आहे. दररोज 5 ते 6 ग्रॅम बडीशेप खाल्ल्याने यकृत आणि दृष्टी सुधारू शकते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

(Follow these homemade tips to overcome the problem of acidity)

हेही वाचा :

पपईच नाहीतर पपईच्या बिया आणि सालही आरोग्यासाठी फायदेशीर!

कॅल्शियम युक्त ‘हे’ पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करा, होतील अनेक फायदे !