सर्व्हे : मोबाईलवर टाईमपास, 80 टक्के भारतीय वेळेत झोपत नाहीत, झोपेची योग्य वेळ कोणती?

Godrej Interio Survey : ‘‘जागतिक निद्रा दिना”निमित्त आयोजित केलेल्या सर्वेक्षणात, वेळेवर झोपायला न जाण्याच्या भारतीयांच्या सबबी उघड झाल्या आहेत.

सर्व्हे : मोबाईलवर टाईमपास, 80 टक्के भारतीय वेळेत झोपत नाहीत, झोपेची योग्य वेळ कोणती?
झोप

मुंबई : तुम्हीही रात्री अंथरुणावर पडून मोबाईलवर टाईमपास करताय? मोबाईलमध्ये वेळ कधी निघून गेला कळत नाही? अंथरुणावर दहा वाजता पडतो, पण झोपायला (Sleep) एक-दीड होतात, असं काहीस सर्व भारतीयांचं सध्या सुरु असल्याचं दिसतंय. ‘गोदरेज इंटिरिओ’ केलेल्या सर्वेक्षणात 80 टक्के भारतीय वेळेत झोपत नसल्याचं समोर आलं आहे. रात्री दहा ही झोपेची योग्य वेळ आहे, मात्र या वेळेत बहुसंख्य लोक झोपत नसल्याचं या सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे. ‘‘जागतिक निद्रा दिना”निमित्त आयोजित केलेल्या सर्वेक्षणात, वेळेवर झोपायला न जाण्याच्या भारतीयांच्या सबबी उघड झाल्या आहेत. (Goderej interio Survey claim 80 percent of Indians do not sleep on time)

रात्री 10 वाजल्यानंतर झोपणे हे वैद्यकीयदृष्ट्या चुकीचे आहे. उशीरा झोपल्यामुळे झोपेच्या पद्धतींमध्ये बदल होतो आणि त्याचे पर्यवसान निद्रानाशामध्ये होते. आपण किती तास झोपलो, याचा त्याच्याशी संबंध नाही, असा निष्कर्ष ‘गोदरेज इंटिरिओ’ने केलेल्या एका सर्वेक्षणात निघाला आहे. रात्री दहा ही झोपायला जाण्याची आदर्श वेळ आहे, हे बहुसंख्य भारतीयांना माहीत असते; तथापि प्रत्यक्षात ते अमलात आणण्याची वेळ आल्यावर मात्र भारतीय नागरिक वेगवेगळी कारणे सांगू लागतात, असेही या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे.

मेट्रो शहरांतील 1 हजार नागरिकांच्या मुलाखती घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले. गोदरेज इंटिरिओ या घरगुती आणि संस्थात्मक अशा दोन्ही क्षेत्रांतील फर्निचरच्या भारतातील आघाडीच्या ब्रँडने, ‘दहा वाजता झोपा’ (स्लीप @ 10) ही मोहीम 2017 मध्ये सुरु केली. भारतातील निद्रानाशाच्या समस्येवर या मोहिमेत लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

‘गोदरेज इंटिरिओ’च्या सोशल मीडिया पेजवर मतदान करणाऱ्या भारतीयांच्या सवयींवर आधारीत हा अहवाल बनविण्यात आला आहे. या सर्वेक्षणात असे आढळले आहे, की दर दहापैकी सात जणांनी वेळेवर झोप न येण्याचे निमित्त म्हणून, सतत काहीतरी (टीव्ही, पुस्तक, मोबाईल, इत्यादी) पाहात असल्याचे नमूद केले. घरकामात गुंतलेलो असल्याने वेळेवर झोप मिळत नाही, असे सुमारे 56 टक्के लोकांनी कबूल केले. झोपण्याची आदर्श वेळ ही रात्री 10 ची असली, तरी स्मार्टफोनवर सतत स्क्रोलिंग करीत राहिल्याने आपण वेळेत झोपत नाही, असे 80 टक्के जणांनी सांगितले.

या निष्कर्षांबद्दल भाष्य करताना, ‘इंटिरिओ’ विभागाचे सीओओ अनिल माथूर म्हणाले, “गोदरेज इंटिरिओ येथे आम्ही राष्ट्राच्या आरोग्यासाठी वचनबद्ध आहोत. स्लीप @ 10 या मोहिमेतून लोकांना झोपण्याच्या योग्य सवयींबाबत प्रोत्साहन दिले जाते. या सवयी संपूर्ण आरोग्यासाठी आणि उत्पादकतेसाठी लाभदायक असतात. आपले आरोग्य किती महत्वाचे आहे आणि हे निरोगी आयुष्य जगण्यासाठी, वेळेवर झोपणे कसे आवश्यक आहे, यावर भर देण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.”

‘गोदरेज इंटिरिओ’ने केलेल्या सर्वेक्षणातील झोपेविषयक आकडेवारीनुसार, 20 टक्के लोक स्मार्टफोनवर उगीचच ‘चॅट’ करीत बसलेले असतात. त्याचप्रमाणे 29 टक्के जणांनी वेळेवर न झोपण्याचे निमित्त म्हणून ‘पायजामा पार्टी’ करीत असल्याचे नमूद केले. 44 टक्के जणांनी “घरातून काम” (वर्क फ्रॉम होम) असा उल्लेख केला. तर काहींनी उशीरापर्यंत चालणाऱ्या कार्यालयीन कामांमुळे वेळेवर झोपता येत नसल्याचे सांगितले.

सर्वेक्षणात नेमकं काय काय?

स्मार्टफोनवर अकारण ‘स्क्रोलिंग’ करीत राहिल्याने 80 टक्के भारतीय वेळेत झोपत नाहीत

• 71 टक्के लोक ‘सतत काहीतरी पाहण्यात व्यग्र
• 56 टक्के लोकांनी ‘घरगुती कामे’ करण्यात गुंतल्याचे दिले कारण
• 56 टक्के लोकांनी दर्शविली सहमती; रात्री 10 हीच आहे झोपेची योग्य वेळ.
• 20 टक्के जण स्मार्टफोनवर उगीचच चॅट करण्यात असतात व्यग्र

संबंधित बातम्या   

Sleep Research | संशोधकांचा नवा दावा, नेहमीपेक्षा ‘इतका’ वेळ अधिकची झोप दिवसभर ऊर्जा देईल!

World Sleep Day 2021 : ‘या’ ट्रिकने 2 मिनिटांत लागेल झोप, युद्धादरम्यान सैनिकही वापरायचे ही पद्धत 

(Goderej interio Survey claim 80 percent of Indians do not sleep on time)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI