100 कोटी
लसीकरण
कोव्हिडपासून देशाचे संरक्षण करण्याच्या दिशेने भारताचे ऐतिहासिक मिशन. मोदी सरकारच्या नेतृत्वात 100 कोटी लसीकरण करण्यात आले. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी लसीकरण मोहिम 1 मे रोजी सुरु झाली
प्रत्येक राज्यात किती लसीकरण झाले आहे, त्याची संपूर्ण माहिती वर्तुळात दिली आहे. ज्या राज्याने अधिक लसी दिल्या आहेत, त्या राज्याचे वर्तुळ तितकेच मोठे आहे. मोठ्या वर्तुळाच्या आत दोन लहान वर्तुळ आहेत, ज्यावर क्लिक करून तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या डोसची आकडेवारी पाहू शकता
21 ऑक्टोबर, 2021
कोरोनाच्या विरुद्ध भारतातील 100 कोटी जनतेने लसीकरण केले आहे. यामध्ये पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे आकडे कमी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार कोरोनाशी मजबूत लढा देण्यासाठी देशात वेगवान लसीकरण मोहीम सुरु आहे. खाली दिलेल्या ग्राफच्या माध्यमातून आपण देशभरातील लसीकरण मोहिमेविषयी माहिती घेऊ शकता. 2021 च्या अखेरपर्यंत सर्व प्रौढ व्यक्तींचे लसीकरण करणे हे सरकारचे लक्ष्य आहे.
या लाइन चार्टमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आणि लसींच्या डोसची माहिती आहे. तुम्ही पहिल्या ड्रॉप डाऊनमधून राज्य निवडू शकता आणि दुसऱ्यावर क्लिक करून जिल्हा निवडू शकता. यानंतर दोन्ही आकडे तुम्हाला दिसतील.
या आलेखानुसार, भारतातील बहुतांश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि आसपास कमी होऊ लागली. तर लसीकरणाची गती सतत वाढत होती. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींसाठी भारतात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. भारतात 100 कोटी लसीचे डोस पूर्ण झाले आहेत.
त्याच वेळी, खाली आपण इतर काही देशांचे अहवाल पाहू शकता, जे प्रति 100 नागरिकांना दिलेल्या डोसवर आधारित आहेत.