Winter Season : हिवाळ्याच्या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करा!

हिवाळ्याची चाहूल लागली आहे. सकाळी गारवा जाणवत आहे. यामुळे आता खाण्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अन्नाचा प्रत्येक ऋतूशी संबंध असतो. या हंगामात मोसमी फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात.

Winter Season : हिवाळ्याच्या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारामध्ये 'या' पदार्थांचा समावेश करा!
आरोग्य
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Nov 16, 2021 | 9:57 AM

मुंबई : हिवाळ्याची चाहूल लागली आहे. सकाळी गारवा जाणवत आहे. यामुळे आता खाण्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अन्नाचा प्रत्येक ऋतूशी संबंध असतो. या हंगामात मोसमी फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. विविध प्रकारची फळे, भाज्या जसे की गाजर, सफरचंद, संत्री, किवी यांचा आहारात समावेश केला पाहिजे. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही हंगामी फळे आणि भाज्या का खाव्यात?

शरीरातील पौष्टिकतेची कमतरता दूर होते

ऋतूनुसार शरीराच्या सामान्य पौष्टिक गरजा बदलतात. थंड हवामान तुम्हाला सर्दी, फ्लू आणि इतर आरोग्य परिस्थितींना अधिक संवेदनशील बनवू शकते. रोग आणि संसर्गाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी भरपूर फळे आणि भाज्या खा. किवी, सफरचंद, लिंबूवर्गीय फळे यांसारखी व्हिटॅमिन सी समृद्ध फळे हिवाळ्यात आहारामध्ये समाविष्ट करा.

पौष्टिक घटक

हंगामी फळे आणि भाज्या यावेळी ताज्या बाजारात उपलब्ध असतात. पौष्टिक मूल्य आणि ताजेपणा राखण्यास मदत करते. यामुळे या हंगामात आपल्या आहारामध्ये जास्तीत-जास्त हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. विशेष म्हणजे हिवाळ्याच्या हंगामामध्ये कोणताही पदार्थ लवकर पचतो.

पालक

पालक खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पालकामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. हे दाहक-विरोधी गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. हे मॅक्युलर डिजेनेरेशन आणि मोतीबिंदूपासून तुमचे रक्षण करते आणि तुमचा कॉर्निया निरोगी ठेवते. विशेष म्हणजे हिवाळ्याच्या हंगामात पालकचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश करा.

संत्री, आले आणि गाजराचा रस

संत्र्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, जे वजन कमी करण्यास आणि पचनास मदत करते. आले हे पचन, फुगवणे आणि पोटदुखीसाठी घरगुती उपाय आहे. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत.

डाळिंब आणि बीट रस

डाळिंब आणि बीटपासून बनवलेले डिटॉक्स पेय सेवन केले जाऊ शकते. हे आयुर्वेदात त्याच्या अनेक डिटॉक्सिफायिंग गुणधर्मांसाठी ओळखले जाते. त्यात कोरफडीचे जेल असते. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे हा हंगामात डाळिंब आणि बीट रस आहारात घेतला पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें