मुंबईत कोरोनाची दुसरी लाट धोकादायक; 80 टक्के रुग्णांमध्ये लक्षणेच नाही

महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. (iqbal singh chahal on asymptomatic cases in mumbai)

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट धोकादायक; 80 टक्के रुग्णांमध्ये लक्षणेच नाही
coronavirus

मुंबई: महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मात्र, मुंबईत आलेली कोरोनाची ही दुसरी लाट अत्यंत घातक असल्याचं दिसून आलं आहे. या दुसऱ्या लाटेत 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळून आलेले नाही. त्यामुळे आरोग्य प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. (iqbal singh chahal on asymptomatic cases in mumbai)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज 30 हजाराहून अधिक रुग्ण सापडत आहेत. मुंबईत तर 49 दिवसात 91 हजार रुग्ण आढळले आहेत. यातील 74 हजार रुग्णांमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षणं आढळून आले नसल्याचं दिसून आलं आहे. तर 17 हजार लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत, पण ज्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे असा लोकांच्या हातावर शिक्का मारण्यात येत आहे. हे लोक सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळल्यास त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. तसेच अशा लोकांना अटकही केली जाणार असल्याचं पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितलं.

तर परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकते

मुंबईत 9900 हॉस्पिटल बेड्स रुग्णांनी भरले आहेत. तर चार हजार बेड्सची सुविधा या आठवड्यात केली जाईल. त्याची ऑनलाईन माहिती मिळेल, असं सिंग यांनी सांगितलं. सरकारला लॉकडाऊन करायचं नाहीये. लोकांनी नियमांचं पालन केलं तर परिस्थितीवर नियंत्रण येऊ शकते. आम्ही मुंबईत कमीत कमी निर्बंध लागू केले आहेत. मुंबईतील कोरोना मृतांची संख्याही कमी झाली आहे. कोणी मास्क लावत नसेल आणि गाईडलाईन्स पाळत नसेल तर त्याला 200 रुपये दंड आकारला जात आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर दंड आकारला जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.

चार हजार रुग्ण आढळले

मुंबईत काल गेल्या 24 तासांत 4 हजार 758 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 3 हजार 34 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 6 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये 6 पुरुष तर 4 महिलांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 85 टक्क्यांवर पोहोचलाय. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता थेट 50 दिवसांवर आला आहे.

राज्यात काय?

राज्यात गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या रुग्णसंख्येत काल काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल गेल्या 24 तासांत राज्यात 27 हजार 918 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 23 हजार 820 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 139 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 3 लाख 40 हजार 542 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (iqbal singh chahal on asymptomatic cases in mumbai)

 

संबंधित बातम्या:

महाराष्ट्राला काहीसा दिलासा, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, पण संकट मात्र कायम

मुंबईला कोरोनाचा विळखा, सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या घटवली

 शरद पवारांवर 8-10 दिवसात आणखी एक शस्त्रक्रिया होणार, राजेश टोपे यांची माहिती

(iqbal singh chahal on asymptomatic cases in mumbai)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI