कानाच्या या पॉईंटवर फक्त 1 मिनिट करा मालिश, डोक्यापासून पायापर्यंत मिळेल आराम

कानांची मालिश केल्याने शरीरात आनंदी भावना येते. दररोज एक मिनिट अशा प्रकारची मालिश केल्याने केवळ तुमचे वजन कमी होणार नाही तर आणखी बरेच फायदे होतील. (Just massage for 1 minute at this point of the ear, you feel relax from headech and stress)

कानाच्या या पॉईंटवर फक्त 1 मिनिट करा मालिश, डोक्यापासून पायापर्यंत मिळेल आराम
कानाच्या या पॉईंटवर फक्त 1 मिनिट करा मालिश, डोक्यापासून पायापर्यंत मिळेल आराम
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 6:20 PM

मुंबई : मानसिक ताण आणि चिंता दोन्हीही लोकांच्या दिनचर्येचा भाग आहे. हे टाळण्याचे बरेच मार्ग आहेत परंतु आपल्याकडे तसे करण्यास वेळ नसतो. अशा परिस्थितीत आपण कानाला मालिश केली पाहिजे. कानाला मालिश केल्याने केवळ आपल्या मज्जातंतूंनाच नाही, तर आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही फायदा होईल. याची उत्तम बाब ही आहे की आपण हे कधीही आणि कोठेही करू शकता. (Just massage for 1 minute at this point of the ear, you feel relax from headech and stress)

कानाच्या मालिशला ‘इअर रिफ्लेकेसेलॉजी’ असे म्हणतात. कानावरील काही अॅक्युप्रेशर पॉईंट्स उत्तेजित होऊन तणाव कमी होऊ शकतो. कान रगडणे, फिरविणे, खेचणे, दाबणे आणि कानाच्या कार्टिजेलला रोल करणे यासारख्या प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला खूप बरे वाटते. कारण कानाच्या रक्तवाहिन्या बर्‍याच नसांशी जोडलेल्या असतात, ज्या पाठिच्या कण्याच्या खाली मज्जातंतूंचा मार्ग पाठवतात. अखेरीस या न्यूरॉन्स शरीराच्या सर्व भागात पोहोचतात, शरीराच्या विविध भागांवर परिणाम करतात. म्हणून कान मालिश केवळ तणावच नव्हे तर बर्‍याच समस्यांसाठी देखील केली जाऊ शकते.

स्नायूंच्या वेदनांपासून आराम

स्नायूंच्या वेदनांमुळे होणारी बेचैनी असह्य आहे. या प्रकरणात कानाला मालिश करणे हा एक चांगला मार्ग आहे. त्यात कानाचे लोब खेचून घ्या आणि चोळा. हे मज्जातंतूला उत्तेजित करते, जे पुढे एंडोर्फिनला रिलिज करते. या प्रक्रियेनंतर आपल्याला बरे वाटू लागते. कानाची मालिश ब्लड सर्कुलेशन वाढविण्यास देखील मदत करते.

डोकेदुखी आणि मायग्रेनपासून मुक्तता

डोकेदुखी आणि मायग्रेनसाठी आपल्याला अनेक प्रकारची औषधे घ्यावी लागतात, परंतु बर्‍याचदा या औषधांचे सेवन चांगले मानले जात नाही. जर आपल्याला नेहमीच डोकेदुखी असेल तर कानाला मालिश केल्यास आराम मिळू शकेल. जर मालिश करणे शक्य नसेल तर आपण पेपरमिंटची चहा देखील घेऊ शकता. हा चहा मालिशचाच एक भाग आहे, यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल.

तणाव आणि नैराश्य कमी होते

तणावपूर्ण स्थितित कानाची मालिश आपल्याला फायदेशीर ठरेल. जेव्हा आपण तणावग्रस्त, चिंताग्रस्त किंवा अस्वस्थ असाल तेव्हा कानांच्या गेट पॉईंटवर म्हणजे वरच्या भागावर मालिश करा. हे गेट पॉईंट आपल्या कानाच्या वरच्या भागात त्रिकोणी आकारात बनलेले असते.

वजन कमी करण्यास फायदेशीर

आपण देखील असा विचार करीत असाल की, वजन कमी करण्याचा कानाच्या मालिशशी काय संबंध आहे. परंतु कधीकधी वजन कमी करण्यासाठी अशा छोट्या युक्त्या आवश्यक असतात. अशी एक युक्ती आहे, ज्याने आपण कानाची मालिश करू शकता. असे म्हणतात की कानाचे वेगवेगळे पॉईंट रगडल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

चांगली झोप मिळते

जर तुमची रात्रीची झोप खराब होत असेल आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला चांगले फिलिंग येत नसेल तर तुम्ही नक्कीच कानाला मालिश केली पाहिजे. खरं तर, रात्री झोप येण्यासाठी व्यक्तीचे डोके तणावमुक्त असणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत कानाच्या मालिशमुळे शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो. चांगल्या झोपेसाठी झोपायच्या आधी 5 मिनिटे दररोज कानाला मालिश करा.

एनर्जी बुस्टर आहे कानाचे मसाज

सकाळी आपल्याला फ्रेश वाटत नाही आणि यासाठी आपण दोन किंवा तीन कप चहा पितो, मग जरा थांबा. असे केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. आपण कान मालिश केल्यास लाभदायी असेल. हे एनर्जी बूस्टर म्हणून कार्य करते. सकाळी उठल्यावर कान घासून घ्या. कानावरील मज्जातंतूच्या उत्तेजनामुळे आपल्या मेंदूच्या पेशी सक्रिय करू शकते, ज्यामुळे आपल्याला फ्रेश वाटेल. पुढच्या वेळी, जेव्हा आपणास उर्जा कमी होण्याची अनुभूती येते तेव्हा कानाला मालिश करण्याचा प्रयत्न करा. (Just massage for 1 minute at this point of the ear, you feel relax from headech and stress)

इतर बातम्या

Gold Silver Rate today: चांगली बातमी! Women’s Day लाच सोने झाले स्वस्त; पटापट तपासा तोळ्याचा भाव

Video | कँटिनमध्ये वेटर म्हणाला, माझे डोळे दुखतात; तात्याराव लहानेंकडून चहा पिता पिता प्रॉब्लेम सॉल्व्ह

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.