Doctor On Call : घर बसल्या मिळणार डॉक्टरांचा सल्ला, जाणून घ्या काय आहे ‘डॉक्टर ऑन कॉल’ सुविधा

आता ‘डॉक्टर ऑन कॉल’ सेवेमुळे छोट्या शहरांनादेखील मोठ्या शहरांप्रमाणेच आरोग्य क्षेत्राच्या सर्व सुविधा गाडी त्यांना परवडतील अशा दरात मिळणार आहेत.

Doctor On Call : घर बसल्या मिळणार डॉक्टरांचा सल्ला, जाणून घ्या काय आहे ‘डॉक्टर ऑन कॉल’ सुविधा
‘डॉक्टर ऑन कॉल’ च्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत देशातील सुमारे दीडशे शहरांमधील हजारो लोकांना आरोग्य सुविधा पुरविल्या आहेत.
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 4:20 PM

मुंबई : सध्याच्या काळात एखाद्याचे उत्पन्न जास्त असले तरीही खर्च देखील तितकेच वाढले आहेत. सध्या लोकांचा बहुतांश खर्च हा आरोग्य आणि शिक्षण संबंधित गोष्टींवर होतो. मोठ्या शहरांमध्ये आरोग्य क्षेत्रासह लोकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा सहज उपलब्ध आहेत. यामुळे, येथे चांगले डॉक्टर आणि सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. परंतु, छोट्या शहरांमध्येही काहीवेळा खूप पैसा खर्च करूनही योग्य उपचार मिळत नाहीत, ही मोठी समस्या आहे. मुलभूत आरोग्य सेवांसाठी देखील लोकांना कधीकधी मैलांचा प्रवास करावा लागतो. परंतु, आता ‘डॉक्टर ऑन कॉल’ सेवेमुळे छोट्या शहरांनादेखील मोठ्या शहरांप्रमाणेच आरोग्य क्षेत्राच्या सर्व सुविधा गाडी त्यांना परवडतील अशा दरात मिळणार आहेत (Know more about Doctor On Call Facility).

‘डॉक्टर ऑन कॉल’ म्हणजे काय?

डॉक्टर ऑन कॉल हे आरोग्य क्षेत्रातील एक नवीन स्टार्टअप आहे. ज्यातून शहरासह, लहान शहरे व खेडेगावांमध्ये डिजिटल माध्यमांद्वारे प्राथमिक आरोग्य सेवा वितरण कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेद्वारे रुग्णांना सर्व प्रकारच्या आजारांपासून बचाव करण्याची सुविधा पुरविली जाणार आहे. ओपीडीपासून छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या रूग्णांच्या रूग्णालयात दाखल होईपर्यंतच्या सर्व आवश्यकता ‘डॉक्टर ऑन कॉल’ सेवा पूर्ण करत आहेत.

छोट्या शहरांमध्ये वैद्यकीय सुविधा

‘डॉक्टर ऑन कॉल’ अंतर्गत लहान शहरांमधील रूग्णांना त्यांच्या बजेटमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी डिजिटल कनेक्टिव्हिटीचा वापर केला आहे. यावर्षी मार्च 2020मध्ये निती आयोग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने टेलिमेडिसिनसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार, नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकास अर्थात डॉक्टर टेलिमेडिसिनद्वारे रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या मार्गदर्शक सूचनांद्वारे टेलीमेडिसिन क्षेत्राला मोठा चालना मिळाली आहे. लोक आता फोनवर डॉक्टरांशी मोकळेपणाने संवाद साधत आहेत (Know more about Doctor On Call Facility).

स्टार्टअप व्यवसायाला गती

‘डॉक्टर ऑन कॉल’ तीन प्रकारची सेवा प्रदान करते. टेलिमेडिसिनद्वारे, रूग्णालयातील रूग्णांची देखरेख व काळजी घेणे, सोबतच इतर रूग्णालयाच्या आऊटसोर्सिंग विभागाचे व्यवस्थापन करून रुग्णांना डिजिटल प्रथम ओपीडी सुविधा कोठे उपलब्ध करायची आहे, याकडे लक्ष ठेवते. ‘डॉक्टर ऑन कॉल’ सुविधा सुरू केल्याने स्टार्टअप व्यवसायालाही वेग आला आहे.

खेडोपाडी आरोग्य सेवा पोहचवण्याचा वसा

‘डॉक्टर ऑन कॉल’ चे संस्थापक डॉ. कर्ण चोप्रा म्हणाले की, मजूर आणि कामगारांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित आहे. त्यांनी सांगितले की, छोट्या शहरांमधील अधिकाधिक लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी त्यांचे हे स्टार्टअप नाविन्यपूर्ण आहे. यात आरोग्य सेवेत लवकरच आरोग्य विमा आणि चाचणी सेवा देखील जोडल्या जात आहेत.

डॉक्टर कर्ण चोप्रा म्हणाले की, ‘डॉक्टर ऑन कॉल’ च्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत देशातील सुमारे दीडशे शहरांमधील हजारो लोकांना आरोग्य सुविधा पुरविल्या आहेत. आता या सेवेत कर्करोग आणि न्यूरोलॉजी तज्ञ डॉक्टरांची सुविधा देखील सामील केली जाणार आहे.

(Know more about Doctor On Call Facility)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.