ज्या औषधासाठी अख्खा महाराष्ट्र रांगेत, ते नेमकं किती प्रभावी? वाचा WHO काय म्हणतंय?

मुंबईसह देशभरात रेमडेसिवीर लसची कमतरता भासत आहे. (No evidence of anti-viral drug's effectiveness in Remdesivir, says WHO)

ज्या औषधासाठी अख्खा महाराष्ट्र रांगेत, ते नेमकं किती प्रभावी? वाचा WHO काय म्हणतंय?
REMDESIVIR
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 1:09 PM

नवी दिल्ली: मुंबईसह देशभरात रेमडेसिवीर लसची कमतरता भासत आहे. त्यावरून राजकारणही सुरू झालेलं आहे. मात्र, या लसीच्या परिणामकारकतेबाबत जागतिक आरोग्य संघटनेने शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे ही लस किती प्रभावी आहे, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. (No evidence of anti-viral drug’s effectiveness in Remdesivir, says WHO)

रेमडेसिवीर कोरोना रुग्णांसाठी प्रभावी आहे की नाही याबाबत कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. डब्ल्यूएचओचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथ आणि कोविड टेक्निकल हेड डॉय मारिया वेन केरखोव यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना रेमडेसिवीरवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. रेमडेसिवीरबाबतचे पाच ट्रायल करण्यात आले आहेत. परंतु, रेमडेसिवीरमुळे कोरोनाचे रुग्ण बरे झाले नाहीत आणि कोरोना बळीची संख्याही रोखता आलेली नाही. अजून एका मोठ्या क्लिनीकल ट्रायलच्या निष्कर्षाची आम्ही वाट पाहत आहोत. त्यावरून रेमडेसिवीर खरोखरच कोरोनावर परिणामकारक आहे का? हे समजून येणार आहे, असं या संशोधकांचं म्हणणं आहे. यापूर्वी देशात रेमडेसिवीरची मागणी वाढल्याने रेमडेसिवीरचा साठा संपला. स्टॉक संपल्याने या लसीच्या निर्यातीवर भारताने बंदी घातली आहे. भारतात कोरोना रुग्णांवर रेमडेसिवीरचा सातत्याने वापर केला जात आहे.

परिणाम नाही

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णावर रेमडेसिवीरचा वापर करण्यात आला होता. परंतु, त्यामुळे रुग्णही बरे झाले नाहीत आणि कोरोना बळींची संख्याही कमी झाली नाही. त्यामुळे गेल्या वर्षी डब्ल्यूएचओने रुग्णांना रेमडेसिवीर न देण्याचे निर्देश जारी केले होते, असं डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितलं. तर आम्ही रेमडेसिवीरचं मोठं क्लिनिकल ट्रायल सुरू केलं आहे. काही प्रमाणात रेमडेसिवीरचा परिणाम होत आहे. मात्र, तरीही क्लिनिकल ट्रायलनंतरच अधिक भाष्य करता येईल, असं केरखोव यांनी सांगितलं.

आठवडाभरात अहवाल येणार

काही अभ्यासातून रेमडेसिवीरमुळे रुग्णांवर चांगला परिणाम झाल्याचं दिसून आला आहे. रेमडेसिवीरमुळे कोरोना बळींची संख्याही कमी झाली आहे. मात्र, अत्यल्प रुग्णांमध्ये हे दिसून आलं आहे. त्यामुळेच आम्ही मोठ्या क्लिनिकल ट्रायलच्या निष्कर्षाची वाट पाहत आहोत. काही आठवड्यांमध्येच हा अहवाल येणार आहे, असं स्वामिनाथन यांनी सांगितलं. डब्ल्यूएचओने रेमडेसिवीरबद्दल प्रतिकूल मत व्यक्त केलं असलं तरी भारतासह जगातील अनेक देशात रेमडेसिवीरचा वापर केला जात आहे. अमेरिकेतील अनेक संशोधकांनीही रेमडेसिवीरला मान्यता दिली आहे. (No evidence of anti-viral drug’s effectiveness in Remdesivir, says WHO)

संबंधित बातम्या:

Coronavirus: कोरोना रुग्णांची संख्या नेमकी आत्ताच इतकी वेगाने का वाढत आहे; तज्ज्ञ म्हणाले….

LIVE | अजितदादांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन घेतली शरद पवार यांची भेट

Corona Cases and Lockdown News LIVE : पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना कोरोनाची लागण

(No evidence of anti-viral drug’s effectiveness in Remdesivir, says WHO)

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.