Diwali 2021 : मधुमेही रुग्णांनी दिवाळीमध्ये ‘या’ टिप्स फाॅलो करा आणि साखर नियंत्रणात ठेवा!

दिवाळी हा वर्षातील मोठा सण आहे. याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. त्यासाठी अनेक दिवस आधीच तयारी सुरू होते. घर स्वच्छ करण्यापासून विविध प्रकारच्या मिठाई आणि पदार्थ बनवण्यापर्यंतची प्रक्रिया सुरू असते. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात गोड पदार्थ केले जातात आणि खाल्ले जातात.

Diwali 2021 : मधुमेही रुग्णांनी दिवाळीमध्ये 'या' टिप्स फाॅलो करा आणि साखर नियंत्रणात ठेवा!
आरोग्य
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 8:59 AM

मुंबई : दिवाळी हा वर्षातील मोठा सण आहे. याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. त्यासाठी अनेक दिवस आधीच तयारी सुरू होते. घर स्वच्छ करण्यापासून विविध प्रकारच्या मिठाई आणि पदार्थ बनवण्यापर्यंतची प्रक्रिया सुरू असते. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात गोड पदार्थ केले जातात आणि खाल्ले जातात. पण अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांसमोर सर्वात मोठी समस्या उभी राहते. जास्त गोड खाणे त्यांच्यासाठी घातक ठरते. दिवाळीमध्ये मधुमेही रूग्णांनी काही खास टिप्स फाॅलो करून साखर नियंत्रणात ठेवली पाहिजे.

गूळ वापरा

तोंड गोड करण्यासाठी साखरच खावी असे नाही. त्याऐवजी तुम्ही गूळ वापरूनही काही गोष्टी तयार करू शकता. गुळापासून बनवलेले गोड पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे गूळ घालून काही मिठाई घरीच बनवा. मधुमेही रुग्ण या गोड पदार्थ मर्यादित प्रमाणात खाऊ शकतात.

शुगर फ्री मिठाई

तुम्ही खीर, फिरनी किंवा इतर काही मिठाईसाठी शुगर फ्री वापरू शकता. तुम्ही स्वतःसाठी स्वतंत्रपणे काही शुगर फ्री मिठाई देखील बनवू शकता. पण बाजारातील शुगर फ्री मिठाई खाणे टाळा.

सुकामेवा आणि स्नॅक्स

सणाचा आनंद फक्त मिठाईनेच घेतला पाहिजे असे नाही. या दरम्यान तुम्ही स्नॅक्स किंवा सुकामेवा खाऊन सणाचा आनंद घेऊ शकता. याशिवाय तुम्ही इतर स्नॅक्स पदार्थ खाऊ शकता.

पाणी प्या

सणाच्या काळात लोक सामान्य दिवसांपेक्षा जास्त जड अन्न खातात. ते पचवण्यासाठी पाणी नीट प्यावे लागते. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवा.

थोडे खा

एकाच वेळी खूप काही खाण्याऐवजी दिवसभर थोडे थोडे खावे. यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल आणि तुम्हाला दिवसभर ऊर्जाही मिळेल.

नियमित चालणे

मधुमेहाच्या रुग्णांसाठी नियमित चालणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात अति खाण्याचं संतुलन राखण्यासही मदत होईल. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी किमान एक तास तरी चालावे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(People suffering from diabetes in Diwali should follow these tips)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.