Pregnancy Problems | गर्भावस्थेदरम्यान का उद्भवते अॅलर्जीची समस्या? जाणून घ्या याची करणे आणि उपाय…

गर्भावस्थेदरम्यान स्त्रिया अनेक मानसिक आणि शारीरिक बदलांना सामोऱ्या जात असतात. या दरम्यान त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:59 AM, 26 Feb 2021
Pregnancy Problems | गर्भावस्थेदरम्यान का उद्भवते अॅलर्जीची समस्या? जाणून घ्या याची करणे आणि उपाय...
गर्भावस्थेदरम्यान का उद्भवते अॅलर्जीची समस्या?

मुंबई : गर्भावस्थेदरम्यान स्त्रिया अनेक मानसिक आणि शारीरिक बदलांना सामोऱ्या जात असतात. या दरम्यान त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सुमारे 25 टक्के महिलांना गरोदरपणात अॅलर्जीची समस्या असते. जर, आपल्याला गर्भधारणेपूर्वी अॅलर्जी समस्या असेल, तर गर्भधारणेच्या वेळी ती आणखी वाढण्याची शक्यता अधिक असते. चला तर, जाणून घेऊया त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय…(Pregnancy problems know the reasons and remedies on allergies during pregnancy)

गर्भधारणेदरम्यान अॅलर्जीची समस्या होण्याचे कोणतेही स्पष्ट कारण नाही. परंतु, बहुतेक वेळा अॅलर्जी नसलेल्या गोष्टींसाठी अतिसंवेदनशीलता हे कारण मानले जाते. काही प्रकरणांमध्ये ही समस्या आनुवंशिकतेमुळे देखील होऊ शकते. या व्यतिरिक्त बदलत्या हवामानामुळे देखील अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो.

‘ही’ लक्षणे दिसू शकतात…

– हवामानाच्या परिणामामुळे वाहणारे नाक, कंजेक्शन, शिंका येणे, डोके दुखणे किंवा डोके जड होणे, ताप येणे आणि डोळ्यांना खाज येणे यासारखी लक्षणे उद्भवू शकतात.

– काही स्त्रियांना बऱ्याच खाद्यपदार्थांमुळे देखील अॅलर्जी असते. या प्रकरणात, लालसरपणा किंवा खाज सुटण्याची समस्या उद्भवू शकते. तसेच, यामुळे काहीवेळा चेहऱ्यावर सूज येते.

अशा प्रकारे ओळखा ‘अॅलर्जी’ची समस्या

विशेषज्ञ लक्षणांच्या आधारे अॅलर्जी चाचण्या घेतात. या वेळी, संभाव्य एलर्जीन निवडले जातात आणि त्वचेवर ठिपके बनवून इंजेक्शन दिले जातात. विशेषज्ञ या रिअॅक्शनच्या आधारे अॅलर्जीच्या स्थितीचे स्पष्टीकरण देतात (Pregnancy problems know the reasons and remedies on allergies during pregnancy).

अशावेळी काय करायवं?

– नियमित व्यायाम करून, प्राणायाम देखील करावा. प्राणायाम केल्याने हवामान बदलल्यामुळे होणार्‍या अॅलर्जीमध्ये त्वरित आराम मिळतो.

– निलगिरीच्या तेलामध्ये उपचारात्मक गुणधर्म असतात, ज्यामुळे छातीत घट्टपणा आणि अनुनासिक रक्तसंचय कमी होतो. आपण पाण्यात याचे काही थेंब टाकून हे स्टीम देखील करू शकता. रात्री श्वासोच्छवासाची समस्या टाळण्यासाठी, त्याचे काही थेंब बेड, चादरी आणि उशावर शिंपडा.

– हळद एक नैसर्गिक अँटी-सेप्टिक आहे. हळदीच्या पाण्याने वाफ घेतल्याने नाकाची सूज कमी होते.

– सर्वप्रथम अॅलर्जीच्या गोष्टी ओळखा आणि त्या गोष्टी पासून अंतर ठेवा. यामुळे आपल्या समस्या कमी होऊ शकतात. परागकण, धूळ आणि प्राण्यांचे केस देखील अॅलर्जीक असतात, म्हणून त्यांच्यापासून दूर रहा.

– गादी, बेड स्वच्छ ठेवा. आठवड्यातून एकदा चादरी कोमट पाण्याने धुवा आणि तुम्हाला धुळीपासून अॅलर्जी असल्यास खिडकी आणि दरवाजे नेहमी बंद ठेवा.

– दिवसाचे घराबाहेर कमी जा. केस नेहमी स्वच्छ ठेवा. धूर, तीव्र वासांपासून दूर रहा.

(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Pregnancy problems know the reasons and remedies on allergies during pregnancy)

हेही वाचा :

Hair Care | गर्भावस्थेदरम्यान केसांची काळजी कशी घ्यावी? वाचा ‘या’ खास टिप्स…

Skin Care | त्वचेला चमकदार बनवेल ‘हा’ हेल्दी ज्यूस, जाणून घ्या याचे फायदे…