मस्तच! आता पाळीव प्राण्यांसाठीही कोरोनाची लस; रशियाने बनवली जगातील पहिली व्हॅक्सीन

जगभरात कोरोनाचा कहर वाढलेला असतानाच एक दिलासादायक बातमी आहे. (Russia registers world's first anti-coronavirus vaccine for animals)

मस्तच! आता पाळीव प्राण्यांसाठीही कोरोनाची लस; रशियाने बनवली जगातील पहिली व्हॅक्सीन
animals

मास्को: जगभरात कोरोनाचा कहर वाढलेला असतानाच एक दिलासादायक बातमी आहे. मनुष्यप्रमाणेच पाळीव प्राण्यांनाही कोरोना होऊ नये म्हणून रशियाने चक्क पाळीव प्राण्यांसाठी कोरोनाची लस तयार केली आहे. त्यामुळे कोरोनापासून पाळीव प्राण्यांचं संरक्षण होणार आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित रोजेलखोनाजोर या संस्थेने याबाबतची घोषणा केली आहे. (Russia registers world’s first anti-coronavirus vaccine for animals)

रशियाने तयार केलेल्या या व्हॅक्सीनचे नाव Carnivac-Cov असं आहे. रशियाच्या फेडरल सेंटर फॉर अॅनिमल हेल्थने ही लस तयार केली आहे. सुरुवातीच्या ट्रायलमध्ये या लसचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. एप्रिलपासून या व्हॅक्सीनचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जाणार आहे, अशी माहिती या संस्थेने दिली आहे. ग्रीस, ऑस्ट्रेलिया, पोलंड, कॅनडा, अमेरिका आमि सिंगापूर आदी देशांनी ही लस खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

अनेक प्राण्यांवर ट्रायल

श्वान, मांजर, बर्फाळ भागात राहणारे कोल्हे, उंदीर, कोल्हा आणि इतर प्राण्यांवर या Carnivac-Cov व्हॅक्सीनची क्लिनीकल ट्रायल करण्यात आली आहे. ही ट्रायल गेल्यावर्षी ऑक्टोबर रोजी करण्यात आली. त्याआधारे ही व्हॅक्सीन प्राण्यांसाठी सुरक्षित आणि संरक्षक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या व्हॅक्सीनमुळे प्राण्यांना कोणतंही नुकसान होणार नाही. या व्हॅक्सीनमुळे प्राण्यांची इम्युनिटी वाढेल. तसेच त्यांच्या शरीरात शंभर टक्के अँटीबॉडीज विकसित होतील, असं रोजेलखोनाजोरचे उपप्रमुख कॉन्स्टेनटीन सावेनकोव यांनी सांगितलं.

अमेरिका आणि फिनलँडमध्ये व्हॅक्सीन

अमेरिका आणि फिनलँडमध्येही प्राण्यांसाठी कोरोना व्हॅक्सीन तयार करण्यात येत आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे पाळीव प्राण्यांबद्दल लोकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाव्हायरसमुळे पाळीव प्राण्यांमध्येही कोरोना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रशियात पहिली व्हॅक्सीन

रशियातच पहिली मानवी कोरोना व्हॅक्सीन तयार करण्यात आली होती. मात्र, या व्हॅक्सीनवर अनेक देशांनी शंका उपस्थित केली होती. एवढेच नव्हे तर रशियन नागरिकही ही व्हॅक्सीन लावण्यास घाबरत आहेत. या व्हॅक्सीनवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, रशियाने ही स्पुतनिक-व्ही व्हॅक्सीन 92 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. (Russia registers world’s first anti-coronavirus vaccine for animals)

 

संबंधित बातम्या:

कोरोना अ‍ॅक्टिव्ह झालाय, कठोर पावलं उचला नाही तर…; केंद्राने दिला राज्यांना निर्वाणीचा इशारा

बीएमसी प्रशासन दक्षता घेतंय, मुंबईकरांनी घाबरुन जावू नये : महानगरपालिका आयुक्‍त चहल

कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक कशी?; 10 मुद्द्यांतून समजून घ्या!

(Russia registers world’s first anti-coronavirus vaccine for animals)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI