Sex During Pregnancy | प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यात सेक्स करणे योग्य की अयोग्य? तज्ज्ञांचा सल्ला…

Sex During Pregnancy Tips | गर्भधारणेच्या 3 महिन्यांनंतर अनेकजण सेक्स करणं बंद करतात. मात्र, मेडिकल सायन्स ( Medical Science) या सगळ्या गोष्टींना साफ नकारतं.

Sex During Pregnancy | प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यात सेक्स करणे योग्य की अयोग्य? तज्ज्ञांचा सल्ला...

गर्भवती राहिल्यानंतर ( pregnancy ) महिलांना बरीच काळजी घ्यावी लागते, अगदी खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते काम करण्याची पद्धतीही बदलण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र, या काळात आपल्या पार्टनरसोबत सेक्स ( Sex During Pregnancy )  करावा की नाही हा प्रश्न सतावत राहतो. त्यामुळंच अनेक दाम्पत्य गर्भधारणेदरम्यान सेक्स करणं टाळतात. सेक्सचा विपरित ( side effect of sex during pregnancy? ) परिणाम पोटात वाढणाऱ्या बाळावर होऊ शकतो असं अनेकांना वाटतं. यामुळंच गर्भधारणेच्या 3 महिन्यांनंतर अनेकजण सेक्स करणं बंद करतात. मात्र, मेडिकल सायन्स ( Medical Science) या सगळ्या गोष्टींना साफ नकारतं. ( pregnancy sex tips )  गर्भवती असताना योग्य काळजी घेऊ सेक्स करणं धोक्याचं नसून फायद्याचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.  ( Is It Safe To Have Sex When Pregnant? )

महिलांना सर्वाधिक सेक्सचा आनंद

गर्भवती असतानाच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. हार्मोन्समुळं महिलांमध्ये आपल्या पार्टनरसोबत सेक्स करण्याची इच्छा सर्वाधिक असते. त्यामुळंच गर्भवती असताना अनेक महिला सेक्सचा सर्वाधिक आनंद घेऊ शकतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यामुळं सेक्स सुखच नाही, तर आपल्या पार्टनरसोबत भावनिक जवळीकही जास्त वाढते. याशिवाय गर्भवती असतानाच्या काळात महिलांच्या शरीरात रक्ताभिसरण अधिक जलद गतीने होतं, त्यामुळं महिला सेक्सचा या काळात अधिक आनंद घेऊ शकतात.

गर्भधारणेदरम्यान सेक्स सुरक्षित?

गर्भवती असताना सेक्स करु नये, तो धोकादायक असल्याचं मेडिकल सायन्स साफ नाकारतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गर्भधारणेच्या कुठल्याही स्टेजवर करण्यात आलेला सेक्स हा सुरक्षित असू शकतो. दाम्पत्यांना तोपर्यंत घाबरण्याची गरज नाही, जोवर गर्भधारणेत काही मोठी समस्या नसेल. गर्भपाताचा धोका त्याचवेळी असतो, ज्यावेळी ब्लिडींग जास्त प्रमाणात होतं. अशा परिस्थितीत डॉक्टरांशी तातडीनं संपर्क साधणं गरजेचं आहे.

गर्भधारणेदरम्यान सेक्स करायचा असेल तर ही काळजी घ्या!

गर्भधारणेदरम्यान सेक्स करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे, या काळात सेक्स करताना स्वच्छतेची जास्तीत जास्त काळजी घ्या. सेक्स ऑर्गन्स स्वच्छ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. शिवाय, सेक्स करताना सेफ्टीचा ( Condom) वापर करा. कारण, या काळात सेक्शुअल ट्रासमिटेड डिसीज ( STD)पसरण्याचा सर्वाधिक धोका असतो.

गर्भधारणेदरम्यान सेक्ससाठी ही पोजिशन सेफ

गर्भधारणेदरम्यान सेक्स करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. स्वच्छतेप्रमाणंच सेक्स पोजिशनही यातील महत्त्वाचा भाग आहे. गर्भधारणेच्या काळात वेगवेगळ्या सेक्स पोजिशन वापरणं टाळावं. या काळात ‘ऑन द टॉप’ किंवा ‘मिशनरी पोजिशन’ सर्वाधिक सुरक्षित असल्याचं डॉक्टर सांगतात. या पोजिशनमध्ये पोटातील बाळाला काहीही त्रास होत नाही.

गर्भधारणेत कधी सेक्स करु नये?

  1.  ब्लिडींग जास्त असेल किंवा एमनॉयटिक फ्लूड लीक होत असेल तर सेक्स करु नये, आणि तातडीने डॉक्टरांना संपर्क साधावा.
  2.  गर्भ कमकुमवत असेल तर सेक्स करण्याचा विचार सोडून द्यावा, आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहावं
  3. जर तुमचा आधीही गर्भपात झालेला असेल, तर सेक्स करणं धोकादायक असू शकतं
  4. गर्भात जुळी वा तिळी बाळं असतील, तर अशा परिस्थितीत सेक्स करणं टाळावं, यामुळं समस्या निर्माण होऊ शकते.

( टीप- गर्भधारणेतील सेक्सबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या )

संबंधित बातम्या:

Sexual Health | हे 6 रोग करु शकतात, तुमची सेक्स लाईफ खराब, सावध राहा!

( Is It Safe To Have Sex When Pregnant? )

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI