हवा आणि पाण्याद्वारे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो? नव्या संशोधनातील माहिती

कोरोना विषाणू आणि त्याच्या लसीबाबत जगभरातील शेकडो वैज्ञानिक संशोधन करत आहेत (Study about corona infection)

हवा आणि पाण्याद्वारे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो? नव्या संशोधनातील माहिती
कोरोना

मुंबई : कोरोना विषाणू आणि त्याच्या लसीबाबत जगभरातील शेकडो वैज्ञानिक संशोधन करत आहेत. विविध वैज्ञानिकांच्या संशोधनातून कोरोना संसर्गाची आतापर्यंत अनेक कारणं समोर आले आहेत. दरम्यान, आयआयटी बॉम्बेचे प्रोफेसर रजनीश भारद्वाज आणि त्यांचे सहकारी अमित अग्रवाल यांनी खोकताना तोंडातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या थेंबातून कोरोनाचा प्रादुर्भाव होतो का याबाबत संशोधन केलं आहे (Study about corona infection).

या संशोधनात खोकताना तोंडातून बाहेर पडलेल्या थुंकीच्या थेंबापासून ते सुक्ष्म कणाचा अभ्यास करण्यात आला आहे. या संशोधनात त्यांनी थुंकीचे बारीक कण हवेत राहतात का की जमिनीवर पडतात, याबाबत अभ्यास केला (Study about corona infection).

“आमची थर्मल आणि लिक्विड मेकॅनिक्सच्या क्षेत्रात संशोधनाची योजना होती. मात्र, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांना संशोधनात सामील करण्यात आलं. या संशोधनात कोरोना संदर्भातील अनेक अनुत्तरित उत्तरं आम्हाला सापडतील, असा आमचा अंदाज होता”, अशी प्रतिक्रिया प्रोफेसर अमित अग्रवाल यांनी दिली.

हवा आणि पाण्याद्वारे विषाणू पसरु शकतो

“या संशोधनात आम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळाली. हवा आणि पाण्याद्वारे थूंकीचे कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. हे कण एखाद्या विषाणूचे वाहक ठरु शकतात”, असं भारद्वाज यांनी सांगितलं. या संशोधनात तोंडातून निघालेल्या थुंकीच्या छोट्या कणांचं हवेत बाष्पीभवन होतं. तर काही सुक्ष्म कण हवेत बराच काळ राहतात, अशी माहिती समोर आली.

बचावासाठी काय करावं?

कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी आतापर्यंत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं. त्याचबरोबर मास्कचा वापर करायला हवा. केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या या नियमांचं पालन केलं तर आपण कोरोनाच्या संसर्गा पासून वाचू शकतो.

हेही वाचा : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे देशात आणखी चार रुग्ण, आतापर्यंत 29 संक्रमितांची नोंद

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI